Video”मला दोघांसोबतही रहायचंय…”; विवाहबाह्य संबंध उघड होताच महिला थेट विजेच्या खांबावर चढली अन…

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात विचित्र घटना घडली आहे. एका महिलेने तिचे अवैध संबंध उघड झाल्याने आत्महत्येची धमकी देत वीजेच्या खांबावर चढली. गेली सात वर्षे तीचे विवाहबाह्य संबंध सुरु होते.
याबद्दल तिच्या नवऱ्याला माहिती मिळाल्यानंतर त्याने तिच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध दर्शवला तसेच प्रियकराला घरी ठेवण्यासाठी नकार दिल्याने तिने असे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या स्थानिक मीडियाच्या अहवालानुसार, महिला तीन मुलांची आई असून महिलेचे गेली सात वर्षे शेजारीच्या गावातील तरुणासोबत अवैध संबंध होते. या संबंधाबद्दल नवऱ्याला समजल्याने तो तिला विरोध करू लागला. तसेच त्याने प्रियकरासमवेत सगळे संबंध तोडण्याचा देखील सल्ला दिला. नवऱ्याने विरोध केल्यानंतर महिलेने आत्महत्या करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. तिच्या प्रियकराने देखील रेल्वेखाली येण्याचा प्रयत्न केला.
नवरा विरोध करत असल्याने महिलेने अलीकडे पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती विजेच्या खांबावर चढताना दिसत आहे. तेथील स्थानिक लोकांनी तिला समजवण्याचा प्रयत्न करत पुन्हा खाली उतरण्याकरीता सांगताना दिसत आहेत. स्थानिकांसमवेत महिलेचा पती, प्रियकर आणि पोलिस देखील तिला समजवताना दिसत आहेत.
मोहब्बत का ऐसा सिला…', 3 बच्चों की मां को चढ़ा 'इश्क का बुखार',
प्रेमी को साथ रखने की बात पर पति से नाराज, खंभे पर चढ़ करने लगी तांडव !!#यूपी के #गोरखपुर से एक हैरान कर देने वाला मामला सामने आया है। यहां तीन बच्चो की माँ को प्यार का खुमार चढ़ा है और प्यार का खुमार भी इस कदर… pic.twitter.com/J6XQ4FMxRh— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) April 3, 2024
महिलेच्या नवऱ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, महिलेला प्रियकरासोबत राहण्याची इच्छा आहे, नवऱ्याला तिचे संबंध समजल्यानंतर तिने आपल्या पतीकडे प्रियकराला घरी ठेवण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी हट्ट धरला. तीन लहान मुले घरात असल्याने नवऱ्याने यासाठी परवानगी नाकारल्याने ती नवऱ्याला वारंवार आत्महत्या करण्याची धमकी देत आहे.