सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कुवेतमधील अबु अल हसानिया बिचवरील अपघाताचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये एक कार बिचवर सुसाट वेगाळे जाताना दिसत आहे. अचानक कार पलटी होते आणि चार-पाचवेळा गोलगोल फिरते.
त्याचवेळी कारचा ड्रायव्हर गाडीतून बाहेर फेकला जातो.(Viral Video Speeding Car Flips Multiple Times Throws Driver In Air)
Shocking video shows the moment a 4WD loses control and rolls multiple times on Abu Al Hasaniya Beach in Kuwait, with the vehicle's 34-year-old driver miraculously walking away from the wreckage with minor injuries. pic.twitter.com/bvPNSpVNtv
— M O I B E N S H I R E (@Kapyoseiin) March 31, 2024
व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क होत आहेत. कारण, रोहित शेट्टीच्या चित्रपटात दाखवलं जातं तशाच प्रकारचा हा अपघात आहे. कार अचानक नियंत्रणाबाहेर जाते आणि गरागरा फिरायला लागते. त्याचवेळी ड्रायव्हर कारच्या बाहेर फेकला जातो. सुदैवाने चालक पाण्यामध्ये पडतो. त्यामुळे त्याला जास्त दु:खापत होत नाही. पण, रस्त्याच्या ठिकाणी असा अपघात झाला असता तर काहीतरी वाईट घडलं असतं हे नक्की
माहितीनुसार, मुबारक-एल-कबीर प्रांतातील हा व्हिडिओ आहे. ३४ वर्षीय ड्रायव्हर बिचच्या बाजूने कार चालवत होता. पण, त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. कारच्या अपघातानंतर ड्रायव्हर अडखळत चालताना दिसत आहे. कारचा पार चेंदामेंदा झाला आहे. घटनेच्या वेळी एक व्यक्ती त्याच ठिकाणी उभा होता. सुदैवाने त्याला धोक्याचा इशारा मिळाला आणि त्याने तेथून पळ काढला.