ताज्या बातम्या

पाकिस्तानात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) असती तर निवडणुकीत एवढा भ्रष्टाचार झाला नसता – इम्रान खान


पाकिस्‍तानमध्‍ये फेब्रुवारी २०२४ मध्‍ये निवडणुका पार पडल्‍या. या निवडणुकीत कोणत्‍याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. तसेच इम्रान खान यांच्‍या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्‍या आरोप केला होता.

आता पुन्‍हा एकदा ‘पीटीआय’चे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्‍तानमधील निवडणूक घोटाळ्यावर भाष्‍य केले आहे. तसेच पाकिस्‍तानमध्‍ये पाकिस्तानात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) असती तर निवडणुकीत एवढा भ्रष्टाचार झाला नसता, असा दावाही कारागृहात असणार्‍या इम्रान खान यांनी केला आहे. ( Pakistan Election )

पाकिस्तानच्‍या निवडणूक आयोगाने ‘ईव्हीएम’ योजना उद्ध्वस्त केली

भ्रष्‍टाचार प्रकरणी शिक्षा झालेले इम्रान खान हे सध्‍या अदियाला कारागृहात आहेत. येथे माध्‍यमांशी बोलताना ते म्‍हणाले की, पाकिस्‍तानची निवडणूक ‘ईव्हीएम’वर आधारित झाली असती तर निवडणुकीत कोणताही घोटाळा झाला नसता. सर्व निकाल अवघ्‍या काही तासांमध्‍ये समोर आले असते. पाकिस्तानचा निवडणूक आयोग, काही राजकीय पक्ष आणि संस्थांनी देशात ईव्हीएम सुरू करण्याची योजना उद्ध्वस्त केली.

Pakistan Election : जनादेश चोरणाऱ्यांवर देशद्रोहाखाली कारवाई झाली पाहिजे

नुकत्‍याच सार्वत्रिक निवडणुकीत सार्वजनिक जनादेश चोरणाऱ्यांवर राजकीय पक्षाच्‍या नेत्‍यांवर देशद्रोहाखाली कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्‍यांनी केली. सध्याच्या सरकारला संकटात सापडलेली अर्थव्यवस्था हाताळणे अशक्य आहे. आर्थिक संकटात आपला पक्ष देश सोडून गेला हेही त्यांनी नाकारले, असेही ते म्‍हणाले.

पाकिस्‍तानमध्‍ये ८ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. मात्रकोणत्‍याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर सर्वाधिक जागा मिळवल्या पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने युती सरकार स्थापन करण्यावर सहमती दर्शवली. अखेर शाहबाज शरीफ यांनी शनिवारी ३ मार्च रोजी पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे २४ वे पंतप्रधान असतील. ते ७२ वर्षांचे आहेत. पाकिस्‍तानचे पंतप्रधानपद तीनवेळा भूषवलेले नवाज शरीफ यांचे ते बंधू आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *