ताज्या बातम्या

‘या’ देशात पुन्हा हिंदू मंदिराची तोडफोड, भिंतीवर द्वेषपूर्ण घोषणा..


कॅनडामध्ये पुन्हा एकदा एका हिंदू (Hindu Temple) मंदिराची तोडफोड झाल्याची घटना समोर आलीये.
श्री स्वामीनारायण मंदिराच्या बाहेरील भिंतीवर काळ्या रंगात हिंदुविरोधी आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.

ओंटारियो प्रांतातील विंडसर शहरामधील (Windsor City) हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली असून द्वेषपूर्ण घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील दोन संशयितांचा शोध सुरू आहे. श्री स्वामीनारायण मंदिराच्या बाहेरील भिंतीवर काळ्या रंगात हिंदुविरोधी आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.

 

विंडसर पोलिसांनी (Windsor Police) सांगितलं की, हिंदू मंदिराची तोडफोड ही द्वेषपूर्ण घटना म्हणून चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात अधिकाऱ्यांनी एक व्हिडिओ मिळवला आहे. यामध्ये मध्यरात्री 12 नंतर दोन संशयित या परिसरात दिसले. व्हिडिओमध्ये एक संशयित इमारतीच्या भिंतीची तोडफोड करताना दिसत आहे, तर दुसरा त्याच्या बाजूला उभा आहे.

पोलिसांनी सांगितलं की, एका संशयितानं काळ्या रंगाचा स्वेटर, काळी पॅन्ट आणि रनिंग शूज घातले होते. तर दुसऱ्या संशयितानं काळी पॅन्ट, स्वेटर, काळे शूज आणि पांढरे मोजे घातले होते.

कॅनडातील हिंदू मंदिरांमध्ये याआधीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. मात्र, आजतागायत तिथल्या सरकारनं कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही. विंडसरमधील मंदिराची तोडफोड होण्याची ही पाचवी घटना आहे. याआधी 14 फेब्रुवारीला मिसिसॉगा येथील राम मंदिरात तोडफोड करण्यासोबतच हिंदुविरोधी आणि भारतविरोधी घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *