ताज्या बातम्या

प्रजासत्ताक दिनानिमित्त विमानाच्या तिकिटावर बंपर सूट


प्रत्येकाचे विमानात बसण्याचे स्वप्न असते. मात्र तिकीट जास्त असल्याने अनेकांना विमानात बसणे शक्य होत नाही. मात्र तुमचे विमानात बसण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विमानाच्या तिकिटावर बंपर सूट दिली जात आहे.

24 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत रेल्वेच्या तिकीट दरापेक्षा कमी दराने विमानाचे तिकीट तुम्ही काढू शकता. देशातील नागरिकांसाठी विमानात बसण्याची सुवर्णसंधी आहे. स्पाईसजेट आणि एअर इंडिया कडून ही ऑफर दिली जात आहे.

वर्षातील सरावात स्वस्त तिकीट दर टाटा समूहाच्या एअरलाइन्स एअर इंडियाने सादर केले आहेत. इकॉनॉमी क्लासच्या तिकिटावर ही ऑफर दिली जात आहे. स्वस्त तिकीट दरामध्ये 49 हून अधिक शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

एअर इंडिया फक्त 1705 रुपयांमध्ये हवाई प्रवास करण्याची संधी देत आहे. या ऑफरचा लाभ घेईचा असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन तिकीट काढू शकता.

स्पाइसजेटने हवाई कंपनीने देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त तिकीट दरात ऑफर ठेवली आहे. देशांतर्ग विमानाने प्रवास करणाऱ्यांना 26% सूट दिली जात आहे. 1126 पासून फ्लाइट तिकीट बुक करण्याची संधी मिळत आहे.

एअर इंडियाने ही ऑफर २४ जानेवारी ते ३० जानेवारी पर्यंत ठेवली आहे. यादरम्यान प्रवासी ऑफरचा लाभ घेऊ शकतात. तसेच स्पाइसजेट हवाई कंपनीने २४ ते २९ जानेवारीपर्यंत ही ऑफर ठेवली आहे. अधिकृत वेबसाइट वर जाऊन कमी दारात तिकीट बुक करू शकता.

तिकीट कसे बुक करावे

एअरलाइन्सच्या माहितीनुसार, स्वस्त तिकीट विक्री सर्व एअर इंडिया शहरातील कार्यालये, विमानतळ कार्यालये, वेबसाइट, मोबाइल अॅप आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे उपलब्ध असेल. या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *