
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने सन्मानित
सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना सहारा एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून त्यांच्या सामाजिक तसेच भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील अनोख्या आंदोलनाची दखल घेऊन सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आज दिनांक.५ जानेवारी गुरूवार रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मेअर हाॅल जुहु लाईन अंधेरी वेस्ट मुंबई येथे सुप्रसिद्ध चित्रपट संगीतकार दिलीप सेन यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष आरूण मराठे तर प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट कलाकार अलीखान,संजय खापरे,हिरेन वैद्य,दिपा चाफेकर,सुरेश हिवराळे आदि मंडळी उपस्थित होती. संस्थापक अध्यक्ष सहारा फाउंडेशन दिग्दर्शक संविधान एक रास्ता अजमत खान यांच्या संकल्पनेतून दरवर्षी सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,कला आदि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
डाॅ.गणेश ढवळे यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.