ताज्या बातम्या

युवकांनो संसदेच्या धर्तीवर ग्रामपंचायत मध्ये शॅडो कॅबिनेट स्थापन करा – बी. जे. गायकवाड


युवकांनो संसदेच्या धर्तीवर ग्रामपंचायत मध्ये शॅडो कॅबिनेट स्थापन करा – बी. जे. गायकवाड
—————————————

गेवराई : काही दिवसापुर्वीच ग्रामपंचायत निवडणूकिचे बिगूल वाजले असून बीड जिल्यातील बऱ्याच गावातील ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या आहेत, गावोगाव जणू धुराळा उठला आहे, गावातील विकासासाठी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या पुढाऱ्याना निवडून आल्यावर दिलेल्या आश्वासणाचा विसर् पडतो,त्याचा परिणाम गावातील गोर गरीब,कष्टकरी,शेतमजूर,विधवा यांच्यावर होतो, जाणूनबुजून विकासापासून वंचित ठेवणे, कागदपत्रे अडवणूक करणे असे प्रकार राजरोजपणे चालू होतात, निवडून येण्याकरता रोज गोर गरीबाची चौकट झाडणाऱ्या या पुढऱ्यांना विसर पडतोच कसा असा प्रश्न काही दिवस उलटल्यानंतर सर्वांनाच पडतो, मात्र वेळ निघून गेलेली असते, गावातील वंचित वर्गाचे हित मागे पडते, आणि हेवेदावे सुरु होतात्, मिळून मिसळून मलिदा लाटण्यासाठी पुढारी एक होतात सामान्य माणूस मात्र पाच वर्ष शिक्षा भोगतो, एक म्हणून सोडा सगळीकडे हिच परिस्थिती उदभवलेली दिसते, अडाणी, निरक्षर लोकांचा आवाज वरच्या अधिकारी लोकांपर्यत पोहचू दिला जात नाही, परिणामी माणूस हताश होऊन सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेतो, सगळ डोळ्यांनी बघुन सुद्धा कानाडोळा करतो हे चित्र गेली काही वर्ष प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये घडतांना दिसते, हे दुर्दैवी आहे, यावर उपाय करणे आगत्याचे आहे, युवकांनी निवडनुक हातात घेणे गरजेचे आहे, गावात कोणती विकास कामे आली, गावच्या विकासासाठी सत्ताधारी काय उपाययोजना करत आहे, गरिबांचे कामं होतात का? ग्रामपंचायत मधील योजना कळवल्या जातात का? यासाठी युवकांनी पुढे झालं पाहिजे बळवंत राय मेहता यांनी देशात पंचायतराज संस्थेचा पाया घातला, आणि गावागावात पंचायती स्थापन झाल्या खऱ्या, मात्र त्यात पुढऱ्यांनी गावातील लोकांची पंचायत केली, देशात संसद सर्वोच्च आहे तर गावखेड्यात ग्रामपंचायत, संसदेत सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवण्याच कामं हे विरोधात असणाऱ्या प्रतिनिधी चे असते, त्याला संसदीय भाषेत शॅडो कॅबिनेट ही म्हटलं जात, शॅडो कॅबिनेट ही सत्ताधारी लोकांवर अंकुश ठेवण्याच कामं प्रभावी पणे राबवते, यात शंका नाही मात्र गावातील ग्रामपंचायत सुद्धा एकप्रकारे गावाची संसद आहे, गावच्या विकासाचे, ध्येय धोरणाचे व्यास पीठ आहे, मग ग्रामपंचायत निवडनुक झाल्यावर गाफिल का रहायच, बीड जिल्यातील युवकांना या माध्यमातून आवाहन करतो, निवडून दिल्यावर सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवा त्यासाठी ससंदेच्या विरोधी पक्षाच्या आघाडी सारखी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये शॅडो कॅबिनेट स्थापण करा, तुमचे हक्क बोलून मिळणार नाहीत, ते हिसाकावून घ्यावे लागतील, त्यासाठी प्रत्येक गावातील युवकांनी सत्तेच्या बाहेर राहून सत्ताधाऱ्यांवढीच शॅडो कॅबिनेट च्या माध्यमातून प्रभावी भूमिका ठरु शकते, त्यासाठी काही अडचणी आल्या तर आम्ही पाठबळ करू, संघर्ष करत रहा, विजय तुमचाच होईल, गोरगरीबा च्या हक्कासाठी लढणार कोणतरी निर्माण होईल, गावातील निधीचा गैरवापर टाळला जाईल, विकासकामं युद्ध पातळीवर होतील, शॅडो कॅबिनेट ग्रामपंचायत मध्ये कुणाच्या दबावाखाली कामं करणार नाही, उलट दबावगट म्हणून काम करेल, तेव्हाच कुठे सत्ताधारी जनतेत मिसळून कामे करतील, प्रत्येक गावकरी एक सैन्य म्हणून तयार होईल, गावातील लोकांना फसवण्याची हिम्मत कुणाची होणार नाही, भ्रष्टाचार करणं सोडा,एक रुपया सुद्धा कुठे जाणार नाही, बीड जिल्यातील युवकांना आवाहन आहे आतापर्यंत महाराष्ट्रात कुठंही ग्रामपंचायत मध्ये शॅडो कॅबिनेट स्थापण झाली नाही, पण मी भोजगाव-कोमलवाडी ग्रामपंचायत मध्ये करतोय , तुम्ही सुद्धा आप आपल्या गावात स्थापन करा, सत्ताधारी होऊन जनतेची सेवा होते असं नाही, एक दबाव गट म्हणून कामं करा, लोकांचे कामे करा, गाव, तालुका,जिल्हा आपोआप सुधारला जाईल, राज्यघटनेने प्रत्येक व्यक्ती हक्क दिलेत त्या हक्काचा वापर करा कायदेशीर मार्गाचा अवलंब केल्यास कुणीही काही बोलण्याची हिम्मत होणार नाही ,प्रत्येक माणूस जोपर्यंत आपल्या हक्कासाठी लढणार नाही तोपर्यंत गावचा विकास होणार नाही ……तूर्तास एवढंच, जय हिंद जय महाराष्ट्र

– बी. जे.गायकवाड


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *