Navgan News

ताज्या बातम्या

पंडित जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय आष्टी.येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिना निमित्त अभिवादन


पंडित जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय आष्टी.येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिना निमित्त अभिवादन

आष्टी : पंडित जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय आष्टी.येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिना निमित्त अभिवादन करण्यात आले
अभिवादन कार्यक्रमानिमित्त प्रमुख व्याख्याते प्रा.संभाजी झिंजूर्के सर उपस्थित होते ,प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.ए.एन.गायकवाड सर, यांनी , महात्मा फुले यांच्या कार्याचा गुणगौरव केला , बहुजन समाजातील मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे भिडे वाडा येथे 1जानेवारी 1848 रोजी सुरू केली , विधवा पुनर्विवाह ,सती कायदा बंद केला , बहुजनातील अठरा पगड जातींच्या लोकांना शाळा ,शिक्षण , आणि महिलांना न्याय , मिळवून देणारे म्हणून पाहिले सत्यशोधक म्हणून महात्मा फुले यांना जगभरात ओळख आहे
पुढे अध्यक्ष समरोप निमित्त प्रा.संभाजी झिंजुर्के सर यांनी स्मृतीदिनानिमित्त , 21व्या शतकातील विद्यार्थी विद्यार्थिनी ,महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख , व जाणीव असली पाहिजे.महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजातील मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे सुरू केली .बालविवाह प्रथा बंद करण्यासाठी ,आणि सती प्रथा बंद करून विधवा पुनर्विवाह सुरू केला , या कार्य साठी त्यांना सामाजिक त्रास झाला , महात्मा फुले यांनी ,बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी चा शोध लावला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर पहिला पोवाडा लिहिला , आणि पहिली जयंती महात्मा फुले यांनी सुरू केली,अस्पृश्य समाजातील मुलांना प्लेग झाला असताना त्याला जीवदान देण्याचे काम केले , महात्मा ज्योतिबा फुले ,यांनी आपल्या जीवनाचा त्याग करून समाजाचा उद्गार केला.विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कष्ट करून मोठे व्हा महापुरुषांचे विचार आत्मसात करा ,असे मार्गदर्शन केले*सूत्रसंचालन , कु.प्रीती झगडे यांनी केले
या प्रसंगी उपस्थित प्रा. वाघुले .एम.एम., प्रा. भवर सर ,प्रा.सावंत सर ,प्रा.गर्जे सर ,प्रा.सानप सर , विशेष सहकार्य ,प्रा.राहुल सोनवणे सर व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. साळवे सर उपस्थित होते


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *