
लग्न झाल्याच्या अवघ्या काही तासांतच ते मोडण्याच्या मार्गावर आल्याची दुर्मिळ घटना चीनमध्ये घडली आहे. नववधूने विवाहाचे कपडे घालून लग्नाच्या एक दिवस आधी प्रियकराशी शारीरिक संबंध ठेवले.
दुसऱ्या दिवशी काही झालंच नाही अशा आविर्भावात ती लग्नासाठी उभी राहिली. लग्न झाल्यानंतर काही वेळात ही बाब नवऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना कळाली. ही बाब सोशल मीडियावरही व्हायरल झाली आणि अनेकांनी या तरुणीबद्दल वाईट-साईट बोलण्यास सुरुवात केली. यामुळे ही नवरी आता लपून बसली असून तिच्या नवऱ्याने पोलिसांत धाव घेतली आहे.
या नवरीने तिच्या प्रियकरासोबत चॅटींग केलं होतं. तिचा प्रियकर शियाओबाईलोंग नावाने चॅटींग करत होता. हे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झालं असून प्रियकरानेच ते व्हायरल केलं होतं. या चॅटबद्दल नवऱ्याला कळाल्यानंतर पोलिसांत धाव घेतली आणि तत्काळ घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. शियाओबाईलोंग याने त्याच्या प्रेयसीला सल्ला दिला होता की लग्नाला 24 तास उरलेले असताना आपण संबंध ठेवूया, ज्याला प्रेयसीने होकार दिला होता. प्रेयसीचं लग्न होत असताना शियाओबाईलोंगने त्यांचं चॅट व्हायरल केलं जे लग्नमंडपातही अनेकांना दिसलं. हे चॅट पाहून संतापलेल्या नवऱ्याने मुलीच्या घरच्यांना दिलेली 23 लाख रुपयांच्या भेटवस्तूही परत घेतल्या आहेत. या प्रकारानंतर नवरी शहर सोडून पळून गेली असून ती अज्ञात स्थळी लपून बसली आहे. या सगळ्या प्रकरारामुळे नवऱ्याचे मानसिग आरोग्य ढासळले असून त्याने मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेण्यास सुरूवात केली आहे. घडल्याप्रकारामुळे जी नाचक्की झाली आहे, त्यामुळे नवऱ्याची आई आजारी पडली आहे ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.