मनसेचे अनोखं आंदोलन
आष्टी : आष्टीशहरात 2016मध्ये सरकारने दुष्काळी परिस्थिती पहाता शेतकऱ्यांना गहू 2किलो तांदूळ 3किलो योजनेची आठ जिल्ह्यांत अंमलबजावणी केली परंतु आज शेतकरी यांचे धान्य बंद केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी आष्टी शहरात भीख मागून निधी जमा केला .
जमा झालेला निधी हा तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी सांगितले हा निधी जमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सेनेच्या सर्व पदाधिकारी यांनी संपूर्ण आष्टी गावात फेरी मारून हा निधी गोळा केला यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब दिंडे, तालुकाध्यक्ष सोपान मोरे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष जयदीप मिसाळ, तालुकापध्याक्ष सुनिल पाचपुते,भरत चव्हाण,रवि माने, किशोर डोमकावळे, महेश अनारसे,लहू भवर आदी उपस्थित होते.