Navgan News

ताज्या बातम्या

पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते “आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र” पुरस्काराने” डाॅ.संतोष मुंडे सन्मानीत


पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते “आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र” पुरस्काराने” डाॅ.संतोष मुंडे सन्मानीत

परळी वैजनाथ : शहरातील सुप्रसिद्ध कान, नाक घसा तज्ञ तथा दिव्यांगाचे कैवारी डॉ.संतोष मुंडे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते “आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. संतोष मुंडे यांना “आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र” पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
डॉ. संतोष मुंडे हे परळी वैजनाथसह महाराष्ट्रात गेल्या 14 वर्षांपासून सामाजिक, आरोग्य, दिव्यांग क्षेत्रात कार्यरत आहेत. आरोग्याच्या क्षेत्रातही तालुक्यातील प्रत्येक गावात डॉ.मुंडे च्या माध्यमातून आरोग्य व औषध उपचार शिबिर घेऊन गरीब रुग्णांना मुंबई, पुणे या ठिकाणी विनामूल्य शस्त्रक्रिया व उपचार करणे साठी मार्गदर्शन, तसेच मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी असो किंवा अन्य कोणत्याही योजना तुन त्या रुग्णासाठी मदत उपलब्ध करून देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.एवढेच नाही तर,आपल्या दवाखान्यात येणाऱ्या वृद्ध,निराधार, गरीब, विधवा,परित्यक्ता, अपंग,सैनिक यांचेकडून कोणतीही फीस घेत नाहीत, त्यांचा विनामुल्य इलाज करतात. त्यांनी आरोग्य शिबिर घेऊन तालुक्यातील गोर गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी वापर केला. त्यांनी परळी तालुका डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची धुराही समर्थपणे सांभाळली आहे. सर्वात कमी वयाचा अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.त्यांनी आपले कार्य रूग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून गोरगरीबांची सेवा करत आहेत. कोरोनाच्या संकटातही 24 तास रूग्ण सेवा दिल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.कोरोना होऊन गेलेल्या म्युकरमायकोसीसची लक्षणे असणाऱ्या रूग्णांची मोफत तपासणी केली. त्यांनी कर्णबधीर अपंगाना 8000 श्रवणयंत्र मशीन ,कुबड्या, काठ्या यांचे मोफत वाटप केलं आहे. तालुक्यात २९ लाख रुपये अपंग निधी, अपंगाना घरकुल वितरित केली. संजय गांधी निराधारांच्या 4087 लाभार्थींना चार महिन्याचे प्रत्येक 4 हजार रुपये तर श्रावणबाळ 10,890 लाभार्थ्यांच्या खात्यात दोन महिन्याचे प्रत्येक 2 हजार रुपये जमा केले. मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून गरजु रुग्णांनी मोफत लाभ मिळाला. फाटलेले, नाव दुरूस्ती व अपडेट राशन कार्डचे शिबीरातील उर्वरित पिवळे व केशरी 4320 कार्डचे त्यांनी वाटप केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी चोखपणे संभाळत आहेत. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या परभणी व हिंगोली प्रभारी पदाची जबाबदारी सक्षमपणे पारपाडली आहे. युवकांना एकत्र करत या दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी पुढे होते.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन राज्यातील विविध जिल्ह्यात युवकांची फळी निर्माण करून मोठे संघटन मजबूत केले आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचारात आघाडीवर योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली सर्वसामान्यांसाठी केलेली लोकउपयुक्‍त कामे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार जनसामान्यांत पोहचविणेचे काम चांगल्या प्रकारे काम केले आहे. या सर्व कार्याची दखल घेत पुन्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची काम करण्याची संधी दिली आहे. परळी मतदार संघातील प्रत्येक गावातील रुग्णाच्या अडचणी सोडविण्यासाठी महत्वकांक्षी धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आरोग्याच्या बाबतीत फार ताकतीच काम उभं केलं आहे.”धनंजय मुंडे आरोग्य मित्र” योजना सुरू केली आहे. त्याच्या माध्यमातून गावातल्या शेवटच्या पेशंट पर्यंत मदत पोहचविण्याचे पुण्याचं काम डॉ.मुंडेच्या पुढाकाराने होत आहे.समाजसवेच बाळ कडू ज्यांच्या कडून घेतेल, ज्यांच्या बोटाला धरून आंदोलन,संघर्ष,केली.त्या माजी मंत्री आ. ओमप्रकाश (बच्चू) कडू यांच्या विषयी चा कृतज्ञ भाव अबाधित आहे. धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले डॉ.संतोष मुंडे यांचे सामाजिक क्षेत्रात अतुलनिय कार्य आहे. हे पुण्यकर्म करत असताना, लायन्स क्लब अध्यक्ष, महाराष्ट्र कॉमर्स अँड चेंबर्सचे संचालक या पदाची जबाबदारी सुद्धा तितक्याच ताकदीने लीलया पेलली आहे. अनेक पदावर कार्यरत आहेत. नुकताच लंडन येथे त्यांना भारतीय दूतावासात विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना अनेक पुसरस्करने सन्मानित करण्यात आलं आहे.अल्पावधीतच मोठी पद भूषवून यशाची अनेक शिखरं पादाक्रांत करत असताना डॉ.मुंडेना कधी अहंकार, गर्व, माठेपणा, लोभ, प्रलोभन, ग्लॅमर या गोष्टींनी स्पर्श सुध्दा केला नाही. सात्विकता,नैतिकता,कृतज्ञ भाव, निर्लोभता,निर्व्यसनी, अल्पसमाधान, कार्य तत्परता, संयम, मित्र वात्सल्य ,सेवाभाव,निर्मळ अंत:कारण, हसतमुख चेहरा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये त्यांची बलस्थाने आहेत. डॉ. संतोष मुंडे सामाजिक, राजकीय, आरोग्य, अपंगांच्या अडचणी सोडविण्यासाठी धरपड करत असतात.म्हणूनच त्याच्या कार्याची दखल घेत पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री मा.डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते युथ राजकारणी अँड सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय यासाठी “आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह भेट देवून सन्मान करण्यात आला. डॉ. संतोष मुंडे यांना आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र” हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक, राजकिय, विधी, वैद्यकिय, पञकार, साहित्य, सांस्कृतिक, शिक्षण, अर्थकारण, उद्योग, शेती, प्रशासकिय , क्रीडा, सहकार, संगीत, कृषी क्षेञातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *