सामाजिक न्याय मंत्र्यांच्या जिल्ह्यात दलित महिलांच्या अंत्यविधी रोखण्याची ३ महिन्यात ३ री घटना, मुख्यमंत्र्यांना तक्रार – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड : महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंढे यांच्या जिल्ह्यातील केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी)गावातील दलित स्मशानभुमीचा प्रश्न ऐरणीवर असुन दलित स्मशानभुमीबाबत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ३ महिन्यात ३ दलित महिलांचा अंत्यविधी रोखुन धरण्याची दुर्दैवी घटना घडली असून संबधित प्रकरणात अंत्यविधी रोखुन प्रेताची विटंबना केल्याबद्दल तसेच जबाबदार तहसिलदार दुलाजी मेंडके यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.
सविस्तर
___
बीड जिल्ह्य़ातील केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी)येथे दि.२६ एप्रिल मंगळवारी अंबुबाई काशिनाथ साखरे (वय ७५ वर्षे) या महिलेचे दुपारी निधन झाले.अंत्यसंस्कार करण्यासाठी गावालगतच्या रिकाम्या शासकीय जागेत अंत्यविधीचे साहीत्य घेऊन गेले असता त्याठीकाणी राहणा-या शेतक-यांनी विरोध करत अंत्यविधी करू देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे अंत्यविधी रखडला.
यापुर्वीही ४ जानेवारी २०२२ रोजी लक्ष्मीबाई शहाजी कसबे या महिलेचा अंत्यविधी रोखण्यात आला होता संतप्त नातेवाईकांनी ५ जानेवारी २०२२ रोजी लक्ष्मीबाई कसबे यांचा मृतदेह ट्रक्टर मधुन केज तहसिल कार्यालय आवारात आणून ठेवला होता. तहसिलदार दुलाजी मेंडके यांनी सामाजिक कार्यकर्ते यांच्या समवेत चर्चा करून अंत्यविधी करण्यात आला होता. तसेच दुस-या घटनेत दि.११ एप्रिल २०२२ रोजी नंदुबाई नामदेव थोरात (वय ५० वर्षे ) या महिलेचाही अंत्यविधी रोखण्यात आला होता.
तहसिलदार दुलाजी मेंडके यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा:-डाॅ.गणेश ढवळे
___
तहसिलदार दुलाजी मेंडके यांचा प्रशासकीय हलगर्जीपणा दिसत असून यापुर्वी दि.५ जानेवारी रोजी मयत लक्ष्मीबाई कसबे यांचा अंत्यविधी रोखल्यामुळे संतप्त नातेवाइकांनी मृतदेह तहसिल कार्यालय आवारात आणून ठेवला होता, त्यानंतर कठोर कारवाई करणे आवश्यक असताना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२






