ताज्या बातम्या
संदीप क्षीरसागर यांच्या आई रेखाताई रविंद्र क्षीरसागर यांचे ऱ्हदयविकाराच्या धक्क्याने निधन

बीड : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व बीड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आई रेखाताई रविंद्र क्षीरसागर [वय ६५ ]यांचे बुधवारी (ता.२० एप्रिल) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ऱ्हदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. त्यांना रात्री अचानक ऱ्हदयविकाराचा तिव्र धक्का बसल्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली होती.
उद्या सकाळी 10 वा अंत्यविधी नवगण राजुरी येथे होणार आहे.
जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली. यानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांचे चाहते आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. रेखाताई क्षीरसागर या धार्मिक वृत्तीच्या होत्या.