बीड जिल्ह्यात दर २० तासाला एका महिलेचा विनयभंग तर ६० तासाला एक महिला लैंगिक अत्याचाराला बळी

राज्यातील बीड जिल्ह्यात दर २० तासाला एका महिलेला विनयभंगाला सामोरे जावे लागते, तर ६० तासाला एक महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडते. बदनामीच्या भीतीने कित्येक जणी तक्रार करायला पुढे येत नाहीत.अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी यावरून ठाकरे सरकारला निशाण्यावर धरले आहे.
“बीड जिल्ह्यात दर २० तासाला एका महिलेचा विनयभंग तर दर ६० तासाला एका महिलेवर लैंगिक अत्याचार होतो. उठता-बसता पुरोगामी महाराष्ट्राचा डंका पिटणारे सत्ताधारी आणि गृह खाते हे सगळेच इतक्या उलट्या काळजाचे कसे ? कि राज्यातील महिलांसाठी “तुमची अब्रू तुमची जबाबदारी” हे राज्याचे धोरण आहे.”, असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्वीट करत केला आहे.
दरम्यान महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा पास करण्यात आला आहे. मात्र असे असूनही राज्यात विनयभंग, हत्या, बलात्कार, लैंगिक अत्याचार अशा घटना घडतच आहेत. यावरून भाजपने ठाकरे सरकारला निशाण्यावर धरत कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ सतत हा मुद्दा मांडत असतात