सिरसदेवी ता.गेवराई येथे मातोश्री सोनाई यांच्या नावाने वृद्धाश्रम काढून समाजसेवेचे कार्य करणार- गोविंदराव राठोड
आष्टी : आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक गोविंदराव देवराव राठोड हे 2022 मार्चअखेर सेवानिवृत्त होत आहेत.त्यांचे शिक्षण बी.ए. बी.पी.एड असे झालेले असून गेवराई तालुक्यातील सिरसदेवी हे त्यांचे जन्मगाव आहे.तर माजलगाव तालुक्यातील तालखेड हे त्यांचे आजोळ होत.सन 1964 सालचा त्यांचा जन्म असून आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयात सेवेत रुजू होण्याआधी त्यांनी प्रौढ शिक्षण विभाग,बीड येथे एक वर्ष सेवा केली आहे.त्यांची कन्या संगीता गोविंदराव राठोड ही यवतमाळ येथे कलेक्टर असून डॉ.राजकुमार गोविंदराव राठोड,डॉ. विजयकुमार गोविंदराव राठोड हे वैद्यकीय क्षेत्रातील एम.एस.आणि एम.डी.उच्चपदवी प्राप्त आहेत.बीड येथील यशोदा बाल रुग्णालय हे डॉ.राजकुमार राठोड त्यांचे रुग्णालय आहे.तर डॉ.विजयकुमार राठोड हे मुंबई येथे रिलायन्स हॉस्पिटल मध्ये सेवेत आहेत.शिवाय दुसरी कन्या अनिता गोविंदराव राठोड ह्या शिक्षिका आहे.हंबर्डे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै.एडवोकेट बन्सीधरराव धोंडीबापू हंबर्डे, कै.मनसुखलाल झुंबरलाल मेहेर,कै.प्राचार्य के. बी.चवरे आणि तत्कालीन संचालक मंडळ,तद्नंतर संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,विद्यमान संचालक मंडळ,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांचे खूप खूप मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले असेही गोविंदराव राठोड यांनी सांगितले.सेवानिवृत्तीनंतर सिरसदेवी ता.गेवराई येथे मातोश्री सोनाई यांच्या नावाने शासनाकडून मदत घेऊन आणि स्वयं सेवाभावी संस्था यांचे सहकार्य घेऊन वृद्धाश्रम काढण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.