Navgan News

ताज्या बातम्या

गेवराई पोलीस निरीक्षकांकडुन गुंडाची पाठराखण;प्रत्यक्ष अजित पवार मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्या आदेशाला केराची टोपली


गेवराई पोलीस निरीक्षकांकडुन गुंडाची पाठराखण;प्रत्यक्ष अजित पवार मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्या आदेशाला केराची टोपली ;गुन्हा दाखल करण्यास टाळाटा
_____
बीड जिल्हापरीषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी अजित पवार यांनी रोहयो अंतर्गत कर्मचा-यांवरील हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी गेवराई पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याविषयी पत्रक दिले परंतु पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ केल्याबद्दल अजित पवार यांनी आज दि.१२ मार्च रोजी पुन्हा गुन्हा दाखल करण्यासाठी गेवराई बीडीओ सानप यांना पत्र देऊन गेवराई पोलीस ठाण्यात पाठवले आहे, दि.९ मार्च २०२२ रोजी कैलास माने व गजानन काळे यांनी गेवराई पंचायत समितीमधील रोजगार हमी योजनाकक्षा मध्ये जाऊन तेथील कंत्राटी कर्मचारी श्री.नितिन बाबासाहेब तोगे आणि अमीरोद्दीन शेख यांना शिविगाळ व धमकी देऊन तेथील काॅम्प्युटर व प्रिंटर याची तोडफोड करण्यात आली होती, त्यानंतर दि.१० मार्च रोजी अजित पवार यांनी गेवराई पोलीस निरीक्षक यांच्या पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यासमक्ष लेखी तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

रोहयो कर्मचा-यांचे मानसिक खच्चीकरण व गुंडाची पाठराखण प्रकरणात कारवाईसाठी गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस अधिक्षक यांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे
____
अजित पवार मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी प्रत्यक्ष पोलीस निरीक्षक यांची तक्रारदारा समवेत भेटून लेखी तक्रार देऊन सुद्धा पोलीस निरीक्षक गेवराई यांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे रोहयो कर्मचा-यांचे मानसिक खच्चीकरण होत असून गुंडाची पाठराखण करत कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलीस निरीक्षक गेवराई यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत गृहमंत्री, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र औरंगाबाद, यांना लेखी तक्रार ईमेल द्वारे केली आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *