रशियावर निर्बंध लादण्यासाठी युक्रेन जगभरातील देशांना एकत्र करत राहिल्यास किव्हचे अस्तित्व धोक्यात येईल – व्लादिमीर पुतिन

किव्ह : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध काही प्रमाणात थांबलं आहे. मात्र रशिया अजुनही आक्रमक आहे. आता रशियाने युक्रेनला थेट धमकी दिली आहे. रशियावर निर्बंध लादण्यासाठी युक्रेन जगभरातील देशांना एकत्र करत राहिल्यास किव्हचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला दिली आहे.व्लादिमीर पुतिन म्हणाले, की युक्रेनच्या बाजूने मारियुपोलमध्येही युद्धविराम तोडण्यात आला आहे. वास्तविक पाहता, रशियाने युक्रेनच्या दोन शहरांमध्ये युद्धविराम घोषित केला होता. जेणेकरून सामान्य नागरिक येथून निघून जातील.
10 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आणि रशियाच्या तीव्र हल्ल्यांदरम्यान आतापर्यंत 14 लाखांहून अधिक युक्रेनियन लोकांनी देश सोडला आहे. रात्री रशियन सैन्याने मारियुपोलवर जोरदार बॉम्बफेकही केली. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला.
दुसरीकडे युक्रेनमधील लोकांनी सैन्यात भरती होण्यास सुरुवात केली आहे. 18 ते 60 वयोगटातील लोक रशियाविरुद्ध शस्त्रे उचलण्यास तयार झाली आहेत. त्यामुळे संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.