अंजनवती गावात दोन रात्रीत ऊसतोड मजुर सख्ख्या भावांचे गोठे जळाले; म्हैश गोठ्यातच जळुन खाक, संशयास्पद प्रकरण,नुकसानभरपाईची मागणी

अंजनवती गावात दोन रात्रीत ऊसतोड मजुर सख्ख्या भावांचे गोठे जळाले; म्हैश गोठ्यातच जळुन खाक, संशयास्पद प्रकरण,नुकसानभरपाईची मागणी
___
बीड : बीड तालुक्यातील मौजे अंजनवती गावातील येडेवस्तीवर सलग दोन रात्रीत दोन सख्या ऊसतोड मजुरांचे गोठे आगीत जळुन भस्मसात झाले असून आगीत म्हैस जागीच जळुन खाक झाली असून बैल व म्हैस गंभीर रित्या भाजल्या असुन संशयास्पद प्रकरण असून संबधित प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येऊन महसुल प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवशाहु ऊसतोड मजुर कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी केली आहे.
जाणीवपुर्वक गोठ्याला आग लावली, नुकसान भरपाई द्यावी:- राजेभाऊ येडे
____
दि.४ मार्च शुक्रवार रोजी रात्री १० वाजता र गोठ्यात आगीचे लोळ उठलेले दिसले मोठ्याप्रयत्नाने आगीतुन गोठ्यात बांधलेल्या जनावरांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यात एक बैल व दोन म्हशी गंभीर रित्या भाजल्या असून एक गाबण म्हैश गोठ्यातच जागीच जळुन खाक झाली, गोठ्यातच असणारी शेतीची आवजारे जळुन खाक झाली यात एकुण अंदाजे २ लाख रूपयांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी एवढीच विनंती.
प्रकरण संशयास्पद असुन शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण, शासनाने नुकसान भरपाई द्यावी:-बाळासाहेब मोरे, प्रदेशाध्यक्ष शिवशाहु ऊसतोड मजुर कामगार संघटना
______
येडेवस्तीवरील दोन सख्या ऊसतोड मजुर भावांच्या गोठ्याला लागलेली आग संशयास्पद असुन शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण असून पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, ऊसतोड मजुर असणा-या येडे बंधुच्या जळालेल्या गोठ्याची अवस्था अत्यंत हद्यद्रावक असून तलाठी आणि पशुवैदकीय आधिकारी यांना कल्पना दिली असून रितसर स्थळपंचनामा, पोस्टमार्टम करून महसुल प्रशासनाने नुकसान भरपाई देऊन आर्थिक हातभार लावावा.