Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचे काळजाला भेगा पाडणारे बोल. कंठ दाटला, सर्वांसमोर रडले


मराठा आरक्षणासाठी अविरत आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे मनोज जारांगे पाटील यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या .

सुमारे 24 तासांहून अधिक काळ मनोज जरांगे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेत संवाद साधला. याच दरम्यान जालना जिल्ह्यातील इच्छुकांशी बोलताना मनोज जरांगे हे भावनिक झाल्याचे दिसले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. या जगात कोणी कोणाचं नाही बाबांनो, हा लढा थांबता कामा नये असे सांगताना मनोज जरांगे यांचा कंठ अक्षरश: दाटून आला होता. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले, हे पाहून सर्वच भावूतक झाले.

 

विधानसभा निवडणुकीमध्ये चूरस वाढण्याची शक्यता आहे. ही निवडणूक जरी महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी होणार असली तरी देखील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील या निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांनी इच्छुकांच्या उमेदवारी घेत त्यांच्याशी संवाद साधला.

 

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?

हा लढा थांबता कामा नये, अशी साद मनोज जरांगे यांनी घातली. समाज भयाण संकटातून जात आहे. संकट तोडायचं कसं ? मी संकट तोडतोय , मला राजकारण्यांचं बळ नाही. मी गोर- गरबी घेऊन किती दिवस लढू ? त्यांच्या मनगटात ताकदही नाही. ज्याच्या मनगटात दगड उचलायची हिंमत राहिली नाही, त्याचे दोन हात- दोन पाय असूनही मोडून टाकल्यासारखे झाले आहेत. त्याला उभारी नाही द्यायची ? त्याच्या हातात काठी नाही द्यायची ?
ते सोडून या वेळेला आपण त्याच्या अंगावर रॉकेल ओतायला लागलोय,असं जरांगे पाटील म्हणाले.

 

एवढ्या मोठ्या, बलाढ्य समाजाचं दु:ख जाणायचं नाही तर कसं होईल? एवढा मोठा समाज संपला ना बाबांनो तर कोणी नाही आपल्याला . या दुनियेत कोणी कोणाचं नाही. आपला समाज देवापेक्षा मोठा आहे, या समाजाने इतिहास घडवून दाखवला. मला तुमची सत्ता नको, मला तुमचे पैसे नको, बळ आणि आशीर्वाद पाहिजे . समाजाची परिस्थिती लय बिकट आहे मराठा समाजाला संपवायला लागले आहेत असे भावनिक उद्गार मनोज जरांगे यांनी काढले.

 

कोणी-कोणी घेतली जरांगेची भेट ?

उमरगा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले मनोज जरांगेच्या भेटीसाठी आले होते. ज्ञानराज चौगुले हे लातूर जिल्ह्यातील उमरगा या राखीव मतदार संघाचे उमेदवार आहेत. शिंदे गटाकडून उमेदवार अर्ज भरून घेतल्यानंतर चौगुले यांनी मध्यरात्री जरांगे पाटील यांची भेट घेतली

 

धुळे विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील इच्छुकांनी अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांची भेट घेत मुलाखती दिल्या. शिंदखेडातून ज्ञानेश्वर भामरे धुळ्यातून राजेंद्र काळे तर धुळे ग्रामीण मधून निंबा मराठे उमेदवारी करणार. अंतरवाली सराटी येथे मनोज जारांगे पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान धुळे जिल्ह्यातून उमेदवारी मिळावी म्हणून ज्ञानेश्वर भामरे, राजेंद्र काळे ,निम्मा मराठे आधी मराठी बांधव पोहोचले होते यावेळी मनोज जरंगे पाटील यांच्याकडे शिंदखेडा साठी ज्ञानेश्वर भामरे, धुळे शहरातून राजेंद्र काळे, सुनील पाटील तर ग्रामीण म्हणून निंबा मराठे यांनी उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखत दिली याबाबत तीस तारखेपर्यंत अंतिम निर्णय मनोज जारंगे पाटील देणार असल्याचं सांगण्यात आलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *