मराठा कुणबी नोंदींचा दुसरा अहवाल, आकडेवारीवरून मनोज जरांगे यांची नाराजी
जालना : मराठा कुणबी नोंदींचा दुसरा अहवाल शिंदे समितीने सरकारकडे सादर केला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील नोंदींच्या आकडेवारीवरून मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठवाड्यात मराठा कुणबी नोंदी खूप कमी प्रमाणात आढळून येत आहे.
काही अधिकारी जाणून बुजून नोंदी शोधत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला असल्याचा दावा एका वाहिनीने केला आहे.
याबाबत बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, एवढ्या कमी नोंदी कशा सापडू शकतात, त्यामुळे शंका येत आहे. अभ्यासक कमी असून, अभ्यासक वाढवले पाहिजे. 24 डिसेंबरच्या आधी प्रशासन ताकदीने कामावर लागल्यास मराठवाड्यात लाखो नोंदी सापडतील.
त्यामुळे यासाठी अभ्यासक वाढवण्याची सरकारला विनंती करतो. तर, काही अधिकारी जाणून-बुजून अहवाल निरंक पाठवत आहेत. काही अधिकारी जातीवाद करत आहेत. त्यामुळे, काही अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून नाही म्हणायचं आणि सरकारने त्यावर विश्वास ठेवायचं असं जमणार नाही,
राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करणे व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला अहवाल सोमवारी राज्य शासनास सादर करण्यात आला. शिंदे समितीकडून मराठा कुणबी, कुणबी मराठा आशा तब्बल 54 लाख नोंदी मिळाल्याची अहवालात नोंद असल्याची माहिती आहे.
आईच्या प्रामणपत्राचा लभा लेकराला का नाही?’मुलांना आईचीही जात लावा’; मनोज जरांगे पाटील