महत्वाचेमहाराष्ट्र

इस्रायलच्या शेतीत क्रांती केलेल्या कंपन्यांनी भारतामध्ये रोवले पाय, शाश्वत शेतीवर दिला भर


अत्यंत लहान असलेला देश म्हणून इस्त्राईल हा देश ओळखला जातो. जगात शेतीमध्ये क्रांती करून मोठा आदर्श निर्माण करून देण्याचे काम या देशाने केले.

इस्त्राईलमध्ये शेतीतील नवतंत्रज्ञान काही नवीन नाही. दरम्यान इस्त्राईल आता भारतातील शेतीत क्रांती करण्यासाठी सज्ज झाला आहे. ICL Group, Netafim आणि BioBee या ती कंपन्या भारतातील शेतीत नवे बदल करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहे.

ICL ही जगभरात खत विक्री करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. या खतांची मात्रा पिकांना दिल्यास मोठ्या पोषक द्रव्य मिळतो असा दावा कंपनीचा आहे. या पोषक द्रव्यातून पिकांच्या कार्यक्षमतेला चालना मिळते तसेच पीक उत्पादन वाढवते याचबरोबर शाश्वत शेतीसाठी या मोठा उपयोग होतो.

ICL च्या eqo.x बायोडिग्रेडेबल खत तंत्रज्ञान शेतीच्या उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या खतापासून पर्यावरणाचा ऱ्हास न होता शेतीत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येते. पर्यावरणामचा ऱ्हास न होता eqo.x ने शेतीमध्ये परिवर्तन करण्याचे आवाहन केले आहे.

eqo.x मुळे शाश्वत शेतीसोबत मातीमध्ये पोषक अन्नद्रव्ये तयार होत असतात तसेच बायोडिग्रेडेबल रिलीझ तंत्रज्ञानामुळे दीर्घकालीन परिणाम होतो. कमी शेतीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जे काही घटक वापरले जातात ते फक्त एका Eqo.x मध्ये असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मोठ्या प्रमाणात खतांच्या माध्यमातून चुकीचे डोस दिले जातात हे थांबवण्यासाठी ICL ही कंपनी काम करत आहे.

ICL ची भारतात मोठी वाटचाल

ICL ने भारतात देखील ICL Leaf लाँच करून आपले अस्तित्व तयार करत आहे. कार्यक्षम आणि किफायतशीर पिकांना अन्न द्रव्ये मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे. याचबरोबर ICL लीफ सध्या भारतीय शेतकर्‍यांना द्राक्षे, कापूस, केळी, टोमॅटो आणि डाळिंब यासह अनेक पिके घेण्यास मदत करत आहे. तसेच अन्य पिकांनाही याचा उपयोग होत असल्याची माहिती आहे.

सिंचन तंत्रज्ञनात नेटाफिमचे मोठं योगदान

जगभरात ठिबक सिंचन साठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेटाफिमने भारतात मोठी वाटचाल केली आहे.  शेती अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी आणि आपल्या पर्यावरणाला कमी हानी पोहोचवण्यासाठी शाश्वत उपाय विकसित करत असते.

त्यांचे स्मार्ट सिंचन तंत्रज्ञान एक गेम-चेंजर आहे, जे शेतकऱ्यांना पाणी आणि पोषक तत्वांचा चांगल्या प्रकारे वापर करण्यास सक्षम करते, पर्यावरणीय प्रभाव कमी करून पीक उत्पादनात वाढ करते.

BioBee-कीटक व्यवस्थापन

सध्या कोणत्याही पिकांचे भरघोस उत्पादन घ्यायचे असल्यास त्याला पहिल्यांदा फटका बसतो तो किटकनाशकांचा. या किटकनाशकांना आळा घालण्साठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करत असतो. दरम्यान इस्त्राईलने यामध्ये मोठी क्रांती केली आहे.

BIO- BEE या कंपनीच्या माध्यमातून किटकनाशकांवर नियंत्रण आणण्याचे काम करत आहे. बायो बी सध्या भारतात मोठ्या प्रमाणात स्थिरावत आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे यातून कोणतीही पर्यावरणीय हाणी होत नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

सध्या भारतात ICL, Netafim आणि BioBee सारख्या इस्रायली कंपन्यांनी मोठी वाटचाल केली आहे. शेतीतील संकटे पाहून आपल्याला भविष्याची चिंता होत असते परंतु इस्रायच्या शेती प्रगतीमुळे पुन्हा आशावाद जागृत होत असतो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *