नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता लवकरच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जून अखेरपर्यंत हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना मिळेल. आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांना १३ हफ्ते केंद्राकडून मिळाले आहेत.
२७ फेब्रुवारीला जवळपास ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला होता. योजनेनुसार देशभरातील शेतकऱ्यांना वर्षभरात प्रत्येकी तीन हप्त्यांमध्ये २ हजार रुपयांचा निधी दिला जातो. जूनमध्ये हप्ता वळता केल्यानंतर दिवाळीपूर्वी १५ वा, जानेवारीत १६ वा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च, एप्रिल दरम्यान १७ वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असे म्हटले जात आहे.