उन्हाळी सुट्टीच्या काळात भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिले आहे. 25 एप्रिल ते 15 जून या दीड महिन्यांच्या कालावधीत साईबाबा संस्थानला तब्बल 47 कोटी रुपयांचे दान मिळाले आहे.
त्याचप्रमाणे लाखो भाविकांनी या दीड महिन्याच्या कालावधीत साई दर्शन घेतले आहे.
गेल्या दीड महिन्यात भक्तांनी साईबाबा संस्थानला दिलेल्या 47 कोटी रुपयांच्या दानात, देणगी कांऊटरवर 26 कोटी, दक्षिणापेटीत 10 कोटी यासह डेबिट, क्रेडिट कार्ड, मनीऑर्डर आणि ऑनलाईन माध्यमातून कोट्यावधींचे दान प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर सव्वा कोटींचे सोने आणि 28 लाखांची चांदीही साईबाबा संस्थानला प्राप्त झाली आहे.
47 कोटींच्या दानासह साईबाबा संस्थानला दीड महिन्यात सशुल्क आरती आणि सशुल्क दर्शन पासच्या माध्यमातून 11 कोटींचे उत्पन्न देखील मिळाले आहे. दरम्यान 22 लाख 41 हजार भक्तांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला आहे. 21 लाख 9 हजार भक्तांनी मोफत तर 4 लाख 23 भक्तांनी सशुल्क दर्शनाचा आणि 70 हजार 578 भक्तांनी सशुल्क आरतीचा घेतला लाभ घेतला आहे.