पुणे : संशोधनाला बळ अन् नवसंकल्पनांचा विस्तार ; जी-20 बैठकीची सांगता
मूलभूत साक्षरता, तंत्रज्ञान-आधारित सर्वसमावेशक व गुणात्मक शिक्षण, भविष्यातील कामाचे स्वरूप लक्षात घेता क्षमताबांधणी, आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन, वाढीव सहयोग व भागीदारीद्वारे संशोधनाला बळ आणि नवसंकल्पनांचा विस्तार या क्षेत्रांवर प्राधान्याने शिक्षणाच्या माध्यमातून भर यात देण्याचा निश्चय जी-20 शिक्षण कार्य गटाच्या चौथ्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने, जी-20 शिक्षण कार्य गटाच्या चौथ्या आणि अंतिम बैठकीचे पुण्यात यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीची बुधवारी सांगता झाली. जी-20 सदस्य देशांचे सुमारे 80 प्रतिनिधी, आमंत्रित देश आणि शिक्षण कार्यगटाशी संबंधित आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, या बैठकीला उपस्थित होते. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक उपाय आणि सामूहिक कृती यावेळी शोधण्यात आल्या.
दोन दिवसीय बैठकीचे अध्यक्षस्थान भारतीय अध्यक्ष आणि उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी भूषवले. तर, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी पर्यायी अध्यक्ष म्हणून होते. पहिल्या दिवशी भारत सरकारच्या जी-20 अध्यक्षांचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन शृंगला या बैठकीला उपस्थित होते.