Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

मुलीच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करा, 21 वर्षांनी मिळतील 71 लाख रुपये

मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भविष्यात सहज भागवता यावा. यासाठी अनेक पालक आतापासूनच बचतीचा विचार करतात. अशा पालकांसाठी केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना हा एक पर्याय आहे, या योजनेत नियमित पैसे जमा करून दीर्घकाळात मोठा निधी तयार करता येऊ शकतो. दरवर्षी किती पैसे जमा करावे लागतील? :सुकन्या समृद्धी योजनेत आर्थिक वर्षात किमान 250 रूपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रूपये जमा करता येतात.म्हणजेच, दरवर्षी 1.5 लाख रुपये करायचे ठरवल्यास दर महिन्याला सरासरी 12,500 रूपये बाजूला ठेवावे लागतील. या योजनेत मुलगी 10 वर्षांची होण्यापूर्वी तिच्या नावाने पालकांना खाते उघडता येते.

21 वर्षांनी किती रक्कम मिळते ? :सध्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर वार्षिक 8.2 टक्के आहे. मात्र सरकारकडून हा व्याजदर भविष्यात बदलू शकतो. दरवर्षी 1.5 लाख रूपये प्रमाणे सलग 15 वर्षे गुंतवणूक केल्यास एकूण 22.5 लाख रुपये जमा होतील. 8.2 टक्के व्याजदर कायम राहिल्यास 21 वर्षांनी 71.8 लाख रूपये मिळतात. यामध्ये साधारण 49.3 लाख रूपये व्याजातून मिळतात.

या योजनेचा उपयोग केवळ लग्नासाठीच नव्हे, तर मुलीच्या उच्च शिक्षणासाठीही होऊ शकतो. नियमानुसार पात्रता पूर्ण झाल्यावर खात्यातील उपलब्ध रकमेच्या 50 टक्क्यापर्यंत रक्कम शिक्षणासाठी काढता येते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.

सुकन्या समृद्धी योजनेचे खाते पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत उघडता येते. गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी योजनेचे सध्याचे नियम व्याजदर आणि पैसे काढण्याच्या अटी तपासून घेणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *