Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढे यांच्यानंतर आता ‘MPSC’मध्ये आणखी एका IAS अधिकाऱ्याची एन्ट्री; भीमनवार रजेवर जाताच सरकारचा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यात विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन झाले. या आंदोलनानंतर MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेले. त्याआधी सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली होती.

त्यामुळे आयोगाची दोन्ही महत्वाची पदे रिक्त झाली होती. अखेर सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार IAS अधिकाऱ्याकडे देण्यात आला.

मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यावर MPSC च्या सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. त्यांनी वर्षभरापूर्वीही या पदाचे अतिरिक्त कामकाज पाहिले होते. त्यामुळे त्यांना एमपीएससीतील कामकाजाचा थोडाफार अनुभव आहे.

विद्यार्थी आंदोलनानंतर राज्य सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाच्या सचिवपदी एफडीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एफडीएच्या कार्यभार सांभाळून ते आयोगातील घोटाळ्यांची चौकशी करतील. त्यामुळे आता दोन आयएएस अधिकाऱ्यांची ‘एमपीएससी’च्या कामकाजावर करडी नजर असणार आहे.

अध्यक्षपदी कोण?

विवेक भीमनवार हे रजेवर गेल्याने अध्यक्षपदाचा कारभार आयोगातील विद्यमान सदस्यांपैकी कुणाकडे दिला जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. चौकशी आयोगाचा अंतिम अहवाल येईपर्यंत भीमनवार रजेवर असणार आहेत. आयोगाला अहवालासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

आयोगामध्ये सध्या अभय वाघ, सतीश देशपांडे, राजीव निवतकर, दिलीप पाटील-भुजबळ आणि सतीश वाघोले हे सदस्य आहेत. वाघ यांच्याकडे यापूर्वीही काही दिवस प्रभारी अध्यक्ष होते. मात्र, त्यांच्यावरही विद्यार्थी आंदोलनात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे अध्यक्षपद दिले जाणार नाही, अशी शक्यता आहे. उर्वरित चार सदस्यांकडे एकाकडे ज्येष्ठतेनुसार अध्यक्षपदाचा कार्यभार दिला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *