Navgan News



Add Space

क्राईम

हत्याप्रकरणात 7 वर्ष शिक्षा भोगली, तुरुंगातून सुटून आला अन् दुबे यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या डोक्याला गोळी लागलेली नेमक घडल काय ?

UP Crime News : उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात तुरुंगातून सुटलेल्या एका व्यक्तीचा गोळी लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. राजकिशोर दुबे (45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर सुमारे दीड महिन्यापूर्वीच त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. मात्र, सुटकेनंतर अवघ्या काही आठवड्यांतच त्याचा मृतदेह आढळल्याने या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकिशोर दुबे याच्या डोक्याला गोळी लागलेली होती.

मध्यरात्रीच्या सुमारास राजकिशोर दुबे यांचा मृतदेह आढळला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका झाडाखाली मध्यरात्रीच्या सुमारास राजकिशोर दुबे यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या डोक्याला गोळी लागलेली होती. घटनास्थळावरून दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी बोलावण्यात आले. पथकाने घटनास्थळावरून ठसे आणि इतर पुरावे गोळा केले आहेत.

आठ वर्षांपूर्वी केला होता मर्डर

राजकिशोर दुबे हे शेजारील मैनपुरी जिल्ह्यातील मेरापूर गावचे रहिवासी होते. सध्या ते ब्रह्मण नगला येथील त्यांच्या बहिणीच्या घरी राहत होते. कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहितेच्या जुन्या कलम 307 अंतर्गत दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात राजकिशोर यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांनी ही शिक्षा पूर्ण केली होती आणि सुमारे दीड महिन्यापूर्वी तुरुंगातून बाहेर आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, राजकिशोर हे अविवाहित होते. सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांनी मद्यधुंद अवस्थेत एका व्यक्तीवर गोळी झाडली होती.

कुटुंबीयांनी सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरा त्यांना मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर त्यांनी राजकिशोर दुबे यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत पाहिले. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राजकिशोर यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा खून आहे की आत्महत्या, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिस अधीक्षक विनोद कुमार यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सध्या पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *