Navgan News



Add Space

क्राईम

आलिशान गाड्या, ५०० ग्रॅम सोनं, १०० कोटींचं ‘साम्राज्य’; सरकारी डॉक्टरकडे कोट्यवधींचं घबाड…

हैदराबाद येथील एका सरकारी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरावर तेलंगणालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या छापेमारीत जॅग्वार आणि ऑडी कार, सोन्याचे दागिने, अनेक फ्लॅट्स आणि कोट्यवधी रुपयांची आर्थिक गुंतवणूक उघडकीस आली आहे.

एसीबीने NIMS चे अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. नोरी लक्ष्मी भास्कर यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हैदराबादमधील त्यांच्या ८ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी दस्तऐवजांनुसार या संपत्तीची किंमत तब्बल ६.१३ कोटी आहे, परंतु प्रत्यक्ष बाजारात तिची किंमत १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
तपासादरम्यान ८ फ्लॅट्स, ४ भूखंड, विशाखापट्टणम येथे ८०० Square Yards चा एक भूखंड आहे. याशिवाय बँकेत ४१ लाख, पोस्ट ऑफिसमध्ये १२ लाख, खासगी आर्थिक गुंतवणुकीत ३५ लाख आणि म्युच्युअल फंडात २९.५५ लाख जमा असल्याचे आढळले आहे.

या मालमत्तांमध्ये एका ४-BHK लक्झरी फ्लॅटचा, कुकटपल्ली येथील दोन ३-BHK फ्लॅट्सचा, तसेच मणिकोंडा, पेटबशीरबाद आणि कुकटपल्ली येथील पाच २-BHK फ्लॅट्सचा समावेश आहे.

तपासात असेही समोर आलं आहे की, डॉ. भास्कर यांनी ‘डीआरटी’ (DRT) वादात अडकलेल्या एका फ्लॅटमध्ये १.३० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तसेच त्यांनी विविध व्यक्तींना १.३३ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपत्तीची पडताळणी आणि पुढील तपास वेगाने सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *