Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास होणार गतिमान

येत्या काळात पुणे-सोलापूर-वाडी या रेल्वेमार्गावर प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी मांजरी स्थानकापासून तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या भूसंपादनाला सुरुवात झाली आहे.

हा प्रकल्प १६ हजार कोटी रुपयांचा असून यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग ताशी १६० किमीपर्यंत वाढणार आहे.

​सध्या या मार्गावर दररोज १०० हून अधिक प्रवासी गाड्या व औष्णिक वीज प्रकल्पांसाठी कोळसा वाहून नेणाऱ्या ६० हून अधिक मालगाड्या धावतात. मालगाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे प्रवासी गाड्यांच्या वेगाला खीळ बसत आहे. ही समस्या ओळखून नॅशनल रेल्वे प्लॅन अंतर्गत २०३० पर्यंत अतिरिक्त मार्गिका टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भविष्यात वाढणारी प्रवाशांची संख्या, रेल्वे गाड्यांची संख्या, रेल्वेची गती यावर वरिष्ठ प्रशासकीय स्तरावरून हालचाली झाल्या आहेत. या नव्या मार्गिकेचे जाळे अधिक व्यापक करणे आवश्यक आहे.

रेल्वे वाहतूक गतिमान

या वाढीव मार्गिकेसाठी पुण्यात ९२ एकर, तर सोलापुरात ५३० एकर जमिनीचे संपादन सुरू आहे. नवीन मार्गिकेवरून ३२ प्रवासी व ४० हून अधिक मालगाड्या धावतील. या नवीन मार्गिकेमुळे रेल्वे वाहतूक सुरळीत व गतिमान होईल.

शहराबाहेरून जाणार

अपलाईनच्या बाजूने मार्गिका आहे. मांजरी ते कुर्डूवाडी या दरम्यान ही नवीन मार्गिका पुण्याच्या दिशेने येणाऱ्या (अपलाईन) मार्गिकेच्या बाजूला असेल. ​सोलापूरजवळ ही मार्गिका शहराबाहेरून जाईल व तिलाटी स्थानकाजवळ मूळ मार्गाला जोडली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *