Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

8व्या वेतन आयोगाची पगारवाढ राहिली बाजूला थकबाकीचे आकडे पाहून सर्वजण थक्क; कर्मचाऱ्यांना मिळणार 7 लाख ते 18 लाख

8वा वेतन आयोग सध्या वेगाने काम करत असून आतापर्यंत विविध शहरांमध्ये कर्मचारी संघटना, कर्मचारी गट आणि प्रतिनिधींच्या भेटी घेतल्या आहेत. या भेटींमध्ये कर्मचारी आणि पेन्शनर्सकडून त्यांच्या विविध मागण्या आयोगासमोर मांडल्या जात आहेत.

त्याचबरोबर आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबतही वेगवेगळे अपडेट्स समोर येत आहेत.

आता आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना एरियरच्या स्वरूपात मोठी रक्कम मिळू शकते, अशी चर्चा आहे. काही गणितांनुसार Level-6 ते Level-8 मधील कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर आणि विलंबाच्या कालावधीनुसार लाखो रुपयांचा एरियर मिळण्याची शक्यता आहे. काही परिस्थितींमध्ये ही रक्कम 18 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

Level-6 ते Level-8 कर्मचाऱ्यांना मोठा फायदा?

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची म्हणजेच DAची गणना त्यांच्या बेसिक पगाराच्या टक्केवारीनुसार केली जाते. त्यामुळे नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर बेसिक पगारात वाढ झाल्यास त्यानुसार DAची रक्कमही वाढू शकते. मात्र आठव्या वेतन आयोगाची अंतिम शिफारस आणि त्यातील फिटमेंट फॅक्टर अद्याप निश्चित झालेला नाही.

वेतन आयोगाच्या अहवालाला 20 ते 24 महिन्यांचा विलंब झाल्यास या कालावधीचा बकाया पगार म्हणजेच एरियर मिळण्याची शक्यता गृहीत धरून काही गणिते मांडली जात आहेत. 2.15, 2.28 आणि 2.57 अशा वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे Level-6 ते Level-8 कर्मचाऱ्यांसाठी एरियरची रक्कम किती असू शकते, याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

18 महिन्यांत अहवाल सादर करण्याची मुदत

नोव्हेंबर 2025 मध्ये अधिसूचित करण्यात आलेल्या अटींनुसार आठव्या वेतन आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार आयोग मे 2027 पर्यंत आपला अहवाल सादर करू शकतो.

मात्र आयोगाला अधिक वेळ लागल्यास तो मुदतवाढीची मागणी करू शकतो. यापूर्वीच्या वेतन आयोगांनीही आपला अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ घेतली होती. त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या अहवालाला विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना त्या कालावधीचा एरियर मिळेल का, याकडे कर्मचारी आणि पेन्शनर्सचे लक्ष लागले आहे.

Level-6 कर्मचाऱ्यांना किती एरियर मिळू शकतो?

एरियरची रक्कम किती असेल हे प्रामुख्याने विलंबाचा कालावधी आणि आठव्या वेतन आयोगात निश्चित होणाऱ्या फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल. Level-6 कर्मचाऱ्यांची किमान बेसिक सॅलरी 35,400 रुपये गृहीत धरली आहे.

जर आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत 18 महिन्यांचा विलंब झाला आणि फिटमेंट फॅक्टर 2.1 असेल तर यानुसार Level-6 कर्मचाऱ्याच्या सुधारित पगारातील वाढ 38,940 रुपये मानली जाते. 18 महिन्यांचा बकाया विचारात घेतल्यास 38,940 × 18 म्हणजेच 7,00,920 रुपये इतका एरियर होऊ शकतो.

याचप्रमाणे फिटमेंट फॅक्टर 2.28 आणि 24 महिन्यांचा एरियर गृहीत धरल्यास रक्कम 10,87,488 रुपये इतकी होऊ शकते. तर 2.57 फिटमेंट फॅक्टर आणि 24 महिन्यांचा बकाया कालावधी गृहीत धरल्यास एरियरची रक्कम 13,33,872 रुपये होऊ शकते.

Level-8 कर्मचाऱ्यांना 17.93 लाखांपर्यंत एरियर?

Level-8 कर्मचाऱ्यांसाठीही वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरनुसार मोठ्या एरियरची गणना करण्यात आली आहे. 2.15 फिटमेंट फॅक्टर आणि 24 महिन्यांचा बकाया कालावधी गृहीत धरल्यास Level-8 कर्मचाऱ्यांना 13,13,760 रुपये एरियर मिळू शकतो.

फिटमेंट फॅक्टर 2.28 आणि 24 महिन्यांचा एरियर गृहीत धरल्यास ही रक्कम 14,62,272 रुपये होऊ शकते. त्याचप्रमाणे 2.57 फिटमेंट फॅक्टर आणि 24 महिन्यांचा बकाया कालावधी गृहीत धरल्यास Level-8 कर्मचाऱ्यांना 17,93,568 रुपये, म्हणजेच जवळपास 18 लाख रुपये एरियर मिळू शकतो.

मात्र हे आकडे अंतिम नाहीत

महत्त्वाचे म्हणजे वरील रक्कम ही वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टर आणि विलंबाच्या कालावधीवर आधारित अंदाजे गणना आहे. आठव्या वेतन आयोगाचा अंतिम फिटमेंट फॅक्टर, सुधारित वेतनश्रेणी, अंमलबजावणीची तारीख आणि एरियरबाबत सरकारचा अंतिम निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे Level-6 किंवा Level-8 कर्मचाऱ्यांना निश्चितपणे 7 लाख, 13 लाख किंवा 18 लाख रुपये एरियर मिळणार, असे सध्या म्हणता येणार नाही. आठव्या वेतन आयोगाच्या अंतिम शिफारशी आणि केंद्र सरकारच्या निर्णयानंतरच प्रत्यक्ष पगारवाढ आणि एरियरची रक्कम स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *