Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या खालून लोकल धावणार, मुंबईकरांना होणार थेट फायदा, अशी असतील 5 स्थानके!

मुंबई महानर प्रदेशातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. आता प्रवासासाठी आणखी एक मार्गिका सुरू होणार आहे. त्यामुळं नागरिकांचा प्रवास सुकर होण्याची चिन्हे आहेत. पनवेल आणि कर्जत मार्गावरुन लवकरच लोकल सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

या मार्गाचे दुपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. दिवाळीत हा रेल्वे मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकतो. सीआरएसच्या मंजुरीनंतर लोकल प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.

कर्जत- पनवेलदरम्यान रेल्वे मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. 29.6 किमी लांबीच्या या दुहेरी मार्गिकेचे काम सुमारे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. दिवाळीत ही लोकल मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकते. त्या पद्धतीने रेल्वेची तयारी सुरू झाली आहे. मात्र त्या पूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मार्गिकेची तपासणी आणि मंजुरी घेणे आवश्यक आहे.

या प्रकल्पामुळं पनवेल-कर्जतदरम्यान पर्यायी उपनगरीय मार्ग उपलब्ध होणार आहे. एकूण 2,782 कोटींचा या प्रकल्पामुळं नवी मुंबईसह कर्जत आणि रायगड परिसर जोडणे अधिक सोप्पे होणार आहे. या मार्गिकेवर एकूण पाच स्थानके आहेत.

सध्या या मार्गिकेवरील स्थानकांच्या कामाची गती वाढवण्यात आली आहे. पनवेल स्थानकातील इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित चार स्थानकातील किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहे. तसंच, सर्व लहान आणि प्रमुख पूल, पाच रस्ते उड्डाणपूल, 16 रस्ते भुयारी मार्ग पूर्ण झाले आहेत. पनवेल आणि कर्जतच्या दिशेने असलेले दोन्ही रेल्वे उड्डाणपूल पूर्ण झाले असून रूळ जोडणीचे काम सुरू आहे. पुणे द्रुतगती महामार्गाखालील भुयारी मार्गातून रूळ जोडणीचे कामही पूर्ण झाले आहे.

पनवेल-कर्जत दरम्यान नवी मार्गिकेवरील तीन बोगदे असून डोंगरातून लोकल धावणार आहे. या तीन बोगद्यांची एकूण लांबी 3,164 किमी असून त्यापैकी वावर्ले बोगदा 2.625 किमी लांबीचा असून तो मुंबई उपनगरीय नेटवर्कमधील सर्वात लांब बोगदा आहे. एकदा का ही मार्गिका सुरू झाली की पनवेल ते कर्जत प्रवास 35 ते 40 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

अशी असतील स्थानके

पनवेल, चिखले,पोयंजे, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके आहे. मोहापे स्थानकाचे नाव बदलून पोयंजे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *