गणेशोत्सवात गोड बातमी! ‘नवसाची गौरी माझी’ गाण्याचा मराठमोळा सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मंगळवारी(२२ सप्टेंबर) पार पडला. यंदा दिल्ली नव्हे तर गुजरातमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाच्या गणपतीत मराठी प्रेक्षकांना गोड बातमी मिळाली. ‘घरत गणपती’ सिनेमातील ‘नवसाची गौरी माझी’ या गाण्याचा गायक अभय जोधपूरकरला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर या कॅटेगरीत अभय जोधपूरकरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते रजत कमळ हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या सोबतच मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी या मराठी सिनेमालाही सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.
नवसाची गौरी माझी’ हे गाणं २०२४ मधील घरत गणपती या सिनेमातील आहे. या गाण्याची क्रेझ आजही कमी झालेली नाही. आजही गौरी गणपतीत हे गाणं हमखास लावलं जातं. प्रदर्शित होताच ट्रेंडमध्ये आलेल्या गाण्यावरील रील आजही तितक्याच व्हायरल होत आहेत. या सिनेमात निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, शुभांगी लाटकर, राजसी भावे, शुभांगी गोखले, संजय मोने, रुपेश बने, समीर खांडेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.



