Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

महाडिक, नरके, आवळे, मानेंसह २०५ अर्ज दाखल; कोणी कोणत्या गटातून अर्ज भरला…जाणून घ्या

गोकुळ’ दूध संघासाठी सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. तब्बल १३३ जणांनी विविध गटातून २०५ अर्ज दाखल केले असून आज, मंगळवार अखेरचा दिवस आहे. उद्या, बुधवारी दाखल अर्जांची छाननी होणार आहे. जनसुराज्यकडून आमदार अशोकराव माने व सर्जेराव पाटील-पेरीडकर, काँग्रेसकडून माजी आमदार राजू आवळे, भाजपकडून शौमिका महाडीक, अशोक चराटी, डॉ. चेतन नरके, अंबरीष घाटगे, नाथाजी पाटील, दिपक पाटील तर राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाच्या वतीने रणजीतसिंह पाटील आदींनी अर्ज दाखल केले. ‘गोकुळ’साठी १५ सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत तब्बल ९५२ अर्जांची विक्री झाली आहे. सर्व गटातून २१९ उमेदवारांनी तब्बल ३२१ अर्ज दाखल केले आहेत.

राखीव गटालाच पसंती…! राखीव गटातील इच्छुकांसाठी निवडणुकीच्या अटी शर्ती तुलनेत शिथील आहेत. त्यामुळे, सर्वसाधारण गटात काही अडचणी आल्या तर इतर मागासवर्गीय, महिला गटात रहावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यावरून दुबार, तिबार अर्ज दाखल केले आहे. नवीद मुश्रीफ, विश्वास पाटील यांनी इतर मागासवर्गीय गटातून अर्ज दाखल केले.

भाजपचीही ‘कपबशी’लाच पसंती भाजपने ‘कपबशी’ चिन्हालाच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या चिन्हाचा क्रम राष्ट्रवादी मित्र पक्षांच्या प्रमाणेच ‘कपबशी’, ‘शिट्टी’, ‘नारळाची बाग’असाच आहे. यावरून, महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार हे स्पष्ट झाले आहे.

या दिग्गजांनी केले अर्ज दाखल…

  • सर्वसाधारण : शौमिका महाडीक, प्रकाश चव्हाण, डाॅ. चेतन नरके, प्रताप पाटील-कावणेकर, सुस्मिता राजेश पाटील, धैर्यशील देसाई, दौलतराव जाधव, नाथाजी पाटील, रविंद्र माने, अजित पाटील-परितेकर, शिवाजी तोडकर, बाबासाहेब देवकर, विशाल गोपाळराव पाटील.
  • महिला राखीव : शौमिका महाडीक, रेवती सत्यजीत पाटील, सुहासिनी प्रवीणसिंह पाटील, स्वाती कोरी, पद्मजा आपटे, श्वेता हत्तरकी
  • इतर मागासवर्गीय : तानाजी पाटील, मधुकर देसाई, नंदकुमार ढेंगे, अशोक चराटी, किशोर पाटील, हिंदूराव चौगले, रघुनाथ पाटील-चिखलीकर, के. एस. चौगले.
  • अनूसूचित जाती : अशोकराव माने, राजू आवळे
  • विमुक्त जाती/भटक्या जमाती : स्मिता गवळी, संतोष धुमाळ, विश्वास जाधव, आनंदा बनकर.
  • गटनिहाय दाखल अर्ज…गट/ उमेदवार/ सोमवारी दाखल अर्ज/ एकूण
    • सर्वसाधारण/७४/१२६/२०५
    • महिला /२३/३०/४७
    • इतर मागासवर्गीय /२२/३०/४७
    • अनूसूचित जाती/०६/०८/१०
    • विमुक्त जाती/भटक्या जमाती /११/०८/१२
    • एकूण/१३३/२०५/३२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *