
इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनेआजच सकाळी इराणची विमान वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करण्याचा आपला मानस जगासमोर मांडला . इराणच्या विमानांना जो देश मदत करेल त्यावर कडक निर्बंध लढण्याचे इशारे देण्यात आल्यानंतर काही तासांतच अमेरिकेत स्वतःची विमान व्यवस्था कोलमडली आहे .
अर्थात यात इराणचा कसलाही संबंध नाही . किंवा इराणवर याबाबतीत शंका निर्माण होत आहेत . असेही कोण सध्या तरी म्हणत नाहीये . कारण अमेरिकेत असा प्रकार घडणे हे दुर्मिळ मानले जात आहे . तांत्रिक बाबींमुळे अमेरिकेतील प्रवासी विमान व्यवस्था विस्कळीत झाली आहे.असे निदर्शनास येत आहे .
अमेरिकेच्या ईशान्य भागातील विमानसेवेला सोमवारी मोठा फटका बसला. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या कम्युनिकेशन यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने न्यूयॉर्क, न्यू जर्सी, फिलाडेल्फिया आणि बोस्टन परिसरातील विमान वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली.
काही विमानतळांवर विमानांच्या आगमनावर तात्पुरते निर्बंध लावण्यात आले, तर अनेक फ्लाइट्सना उशीर झाला किंवा त्यांचे वेळापत्रक बदलावे लागले. काही विमानांना इतर विमानतळांकडे वळवण्यात आले.
कम्युनिकेशन सिस्टीममध्ये बिघाड; बॅकअपही ठरला अपुरा
फिलाडेल्फिया परिसरातील फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल सुविधेतील कम्युनिकेशन सर्किटमध्ये अचानक बिघाड झाला. त्यानंतर बॅकअप यंत्रणा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, न्यू जर्सीतील बांधकामादरम्यान महत्त्वाची फायबर-ऑप्टिक केबल तुटल्याने अडचण आणखी वाढली. विमान वाहतूक नियंत्रक आणि विमानांमधील संपर्क सुरळीत न राहिल्याने सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणी विमानांची वाहतूक मर्यादित करण्यात आली.
JFK, Newark आणि LaGuardia विमानतळांवर परिणाम
न्यूयॉर्क परिसरातील JFK, LaGuardia आणि Newark हे प्रमुख विमानतळ या तांत्रिक समस्येमुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. फिलाडेल्फिया आणि बोस्टन विमानतळांवरही विमान वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले. काही काळ Newark विमानतळावर विलंबाचा आकडा तब्बल हजारोंमध्ये पोहोचला. प्रवाशांना विमानतळांवर तासन्तास प्रतीक्षा करावी लागली, तर अनेक फ्लाइट्सचे वेळापत्रक बदलण्यात आले.
सुमारे 7 हजार फ्लाइट्सवर परिणाम
या तांत्रिक बिघाडाचा परिणाम केवळ काही विमानतळांपुरता मर्यादित राहिला नाही. अमेरिकेतील एकूण विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. उपलब्ध आकडेवारीनुसार, सुमारे 7 हजार फ्लाइट्सना विलंब किंवा रद्दीकरणाचा फटका बसला.
न्यूयॉर्क परिसरातील तीन प्रमुख विमानतळांवरच सुमारे 1,400 फ्लाइट्स प्रभावित झाल्याचे समोर आले. दरम्यान, तुटलेली फायबर केबल दुरुस्त करण्यात आल्यानंतर विमान वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. मात्र, आधीच निर्माण झालेल्या विलंबामुळे पुढील फ्लाइट्सच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला.



