
मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या विरोधकांनी ईडीकडे तक्रार केली होती. त्याआधारे जरांगे यांच्या सहकाऱ्यांची आर्थिक चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान आज पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी या चौकशीचा मुद्दा समोर आणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे. त्यांनी उपोषण मागे घेताच आयकर खात्याकडून चौकशी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर जरांगे यांची तिखट प्रतिक्रिया समोर आली आहे.
मनोज जरांगे आक्रमक
मराठा आंदोलनाला कुणीच साथ द्यायची नाही का? जे आंदोलक साथ देत आहेत. त्यांना तुरुंगात टाकणार, तुरुंगात टाकणार असंच करणार तुम्ही, तुमचं सरकारही कधी तरी बदलणारच ना. मग आम्ही सुद्धा खुनशी आहोत. एकनाथ शिंदे यांचे आमदार, खासदार, मंत्री आमच्या कामाला यायला हवे होते. तर ते आमच्या चौकशा लावण्याच्या कामाला येत आहे, ही आनंदाची गोष्ट झाली आहे. हरकत नाही. मराठा आंदोलक गुंतवायचे काम त्यांनी पूर्ण करून घ्यावं. आम्ही काही मागं सरकणार नाही, असा पलटवार जरांगे पाटील यांनी केला.



