Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

निळं बॅकग्राउंड, मध्यभागी फुटबॉलपटू आणि तिरंग्याचा स्पर्श; ममता बॅनर्जी गटाने प्रसिद्ध केला नवा निवडणूक लोगो

तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्या गटाने सोमवारी नव्या निवडणूक चिन्हाचा लोगो प्रसिद्ध केला. निवडणूक आयोगाने या गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुटबॉल खेळाडू’ हे अंतरिम निवडणूक चिन्ह दिले आहे. नव्या लोगोच्या मध्यभागी फुटबॉल खेळाडूचे चिन्ह असून, निळ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या अक्षरांत पक्षाचे नवे नाव लिहिले आहे. या लोगोमध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा रंगही वापरण्यात आला आहे. पक्षाच्या नेत्यांनी, आमदारांनी, खासदारांनी आणि कार्यकर्त्यांनी नव्या चिन्हाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.पक्षातील अंतर्गत वादामुळे निवडणूक आयोगाने ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे जुने नाव आणि ‘दोन फुले व गवत’ हे पारंपरिक चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या गटाला नवे नाव व चिन्ह देण्यात आले. दुसऱ्या गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘लिफाफा’ चिन्ह देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *