Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

केतनला दरीत ढकलताना नेमकं कोणी पाहिलं? ‘ते’ तिघे देणार कोर्टात साक्ष, प्रकरणात नवा ट्विस्ट

लोहगडावरून दरीत पडून झालेल्या केतन अगरवालच्या मृत्यू प्रकरणात एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक खुलासा झाला आहे. केतनचा अपघाती मृत्यू नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी आपल्या चार्जशीटमध्ये केला आहे.

विशेष म्हणजे, केतनला दरीत ढकलताना तब्बल तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पाहिल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या चार्जशीटमधून समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी संगनमत करून केतनला लोहगडावर नेले आणि तिथून दरीत ढकलून दिले. सुरुवातीला हा निव्वळ अपघात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासाअंती यामागील हत्येचा कट उघडकीस आला आहे.

तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष ठरणार निर्णायक

या प्रकरणात केतनला दरीत ढकलताना नेमकं कोणी पाहिलं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी घटनास्थळी तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. या साक्षीदारांनी केवळ सिया आणि चेतनला लोहगडावर एकत्र पाहिलेच नाही, तर त्यांनी केतनला दरीत ढकलत असताना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याचा दावा पोलिसांनी चार्जशीटमध्ये केल्याची माहिची सूत्रांनी दिली आहे. हे तिन्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आता वडगाव मावळ न्यायालयात आरोपींविरोधात साक्ष देण्यास पूर्णपणे तयार आहेत. त्यामुळे येणाऱ्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान या तीन साक्षीदारांची साक्ष आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

5000 हून अधिक पानांची चार्जशीट दाखल

केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांनी 5000 हून अधिक पानांची चार्जशीट दाखल केली असून या प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. तर ज्येष्ठ विधिज्ञ उज्जवल निकम या केसमध्ये सरकारी बाजू मांडत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमधून एक फोटो समोर आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरातील हा फोटो होता. सिया आणि चेतनचा विवाह इथंच झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *