Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

अजित पवार यांचा घातपात की अपघात? अहवाल महिन्याभरात येणार? AAIB ने काय सांगितलं

मोठी बातमी समोर येत आहे, अजित पवार यांच्या अपघाताचा अहवाल आता एका महिन्यात येण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात दाखल केलेल्या तक्रारीवर AAIB कडून तसं अश्वासन देण्यात आलं आहे. अजित पवार यांचा घातपात की अपघात असा सवाल करणारी तक्रार दाखल करण्यात आली होती. इंडिया अगेन्स्ट करप्शन एनजीओचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही तक्रार दाखल केली होती. याच संदर्भात आज एएआयबीच्या कार्यालयात जाऊन डीजी यांची भेट घेतल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली आहे. महिन्याभरात अपघाताबाबत सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील, अशी अपेक्षा या भेटीनंतर हेमंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या अपघाताच अहवाल महिन्याभरात येणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकं काय म्हणाले हेमंत पाटील?

अजित पवारांचा अपघात की घातपात? या संदर्भात बारामतीमध्ये तक्रार केली होती, या तक्रारीची दाखल घेतली नाही म्हणून तहसीलदारांची भेट घेतली. त्यांनीही दखल घेतली नाही म्हणून मग मी उच्च न्यायालयात गेलो. तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणाचा तपास AAIB करत आहे. यावर मी जून महिन्यात AAIB कडे तक्रार केली. मात्र तक्रारीवर उत्तर मिळाले नाही, म्हणून आज AAIB चे डीजी यांची मी भेट घेतली. त्यांनी सांगितले की तपास एका महिन्यात पूर्ण करून अजित पवार यांच्या अपघाताचा अहवाल जारी करू, अजित पवार यांचा अपघात नसून घातपात असल्याची तक्रार केली होती, एका महिन्यात अहवाल नाही मिळाला तर पुन्हा उच्च न्यायालयात जाणार, असा इशारा देखील यावेळी हेमंत पाटील यांनी दिला आहे.

अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला निघाले होते. बारामती विमानतळावर विमान उतरत असतानाच विमान थेट जमिनीवर कोसळलं, या भीषण अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *