Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

NSE IPO मध्ये गुंतवणुकीची शेवटची संधी; अलॉटमेंट होण्यापूर्वीच घाबरवतोय GMP, ग्रे मार्केटमध्ये शेअरची वाईट स्थिती

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या बहुप्रतीक्षित आयपीओसाठी गेल्या आठवड्यात 17 सप्टेंबर रोजी बोली सुरू झाली आणि सोमवार, 21 सप्टेंबर रोजी, बोली लावायचा शेवटचा दिवस आहे. या दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच व्यवहार दिवशी देशांतर्गत बाजारात हिरवळ पसरली असताना अनलिस्टेड बाजारात मोठा ट्विस्ट आला आहे.

एनएसईचा आयपीओ जाहीर झाल्यापासून 285 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला ग्रे मार्केट प्रीमियम दर आता नीचांकीवर कोसळला आहे.

एनएसई आयपीओचा GMP गडगडला

सोमवार, 21 सप्टेंबर रोजी, एनएसई आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम 63 रुपये नोंदवला गेला आहे, जो दिवसाच्या सुरुवातीला – 48 रुपयांवर – 18 सत्रांमधील सर्वात नीचांकीवर घसरला होता. यामुळे प्रश्न निर्माण होतो की, NSE आयपीओ गुंतवणूकदारांना सुरुवातीलाच आश्चर्यचकित करेल का? एनएसई आयपीओ दोन दिवसांतच 100% सबस्क्राईब झाला आहे.

ग्रे मार्केटमधून NSE आयपीओला धोक्याचा इशारा?

इन्व्हेस्टर्स गेनच्या एका अहवालानुसार, एनएसई आयपीओ आज ग्रे मार्केटमध्ये 48 रुपयांवर प्रीमियमवर ट्रेड करत असून सध्याच्या GMP नुसार लिस्टिंगवर गुंतवणूकदारांना अंदाजे 3% लिस्टिंग गेन दिसत आहे. अशाप्रकारे, सध्याच्या ग्रे मार्केट प्रीमियम दरानुसार एनएसई आयपीओ अंदाजे 1833 रुपयांना बाजारात डेब्यू करू शकतो. म्हणजे GMP वरून सध्या गुंतवणूकदारांना माफक लिस्टिंग नफ्याचे संकेत मिळत आहेत.

पण एकेवेळी एनएसई आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम दर अनलिस्टेड बाजारात 300 रुपयांवर उसळला होता, ज्यामध्ये गेल्या काही दिवसांत प्रचंड ट्विस्ट पाहायला मिळाले. मागील काही दिवसांपासून एनएसई आयपीओच्या GMP मध्ये लक्षणीय घट झाली असून यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. त्याचवेळी, लक्षात घ्या की GMP केवळ आयपीओच्या संभाव्य लिस्टिंग किंमतीचा अंदाज देतो. ग्रे मार्केट प्रीमियम अनधिकृत बाजार निर्देशक असून प्रत्यक्ष लिस्टिंग किंमत यापेक्षा वेगळी असू शकते.

दरम्यान, सबस्क्रिप्शनच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सकाळी 11:15 वाजेपर्यंत एनएसई आयपीओ 1.68 पट सबस्क्राईब झाला. या इश्यूच्या अप्पर किंमत बँडनुसार रिटेल गुंतवणूकदारांना किमान 14,280 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. मंगळवार, 22 सप्टेंबर रोजी, या आयपीओमधील शेअर्सचे अलॉटमेंट फायनल होणे अपेक्षित असून त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी बीएसईवर NSE शेअर्स लिस्ट होऊ शकतात.

NSE आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल असून यामध्ये 12.64 कोटी इक्विटी शेअर्स विकेल जात आहेत. आयपीओचा किंमत बँड 1700 ते 1785 रुपये निश्चित केला गेला असून यातून मिळणारा निधी एनएसईकडे जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *