
डॉ. हेमलता बागला यांनी शनिवारी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, माजी प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. संजय नेरकर, डॉ. जयश्री शिंदे, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण, क्रीडा संचालक डॉ. कविता खोलगडे, अभियंता आशिष कांबळे, सहायक वित्त व लेखाधिकारी जान्हवी भोळे, सहायक कुलसचिव मनोज गोसावी, सहायक कुलसचिव अंगत पुकळे उपस्थित होते.
यावेळी डॉ. हेमलता बागला यांनी महर्षी कर्वे यांना अभिवादन केले. तसेच विद्यापीठाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. हेमलता बागला यांनी विद्यापीठाच्या विविध विभागांच्या कामकाजाचा तसेच सद्यस्थितीचा आढावा घेतला. विद्यापीठातील शैक्षणिक, प्रशासकीय आणि इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. विद्यापीठाच्या पुढील वाटचालीसाठी विविध शैक्षणिक व प्रशासकीय उपक्रमांना चालना देण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.



