शेअर बाजारात 21 सप्टेंबरला मोठ्या घडामोडींची शक्यता, ‘या’ 5 स्टॉक्सवर लक्ष ठेवा, योग्य रणनीतीनं तगड्या कमाईची संधी

मुंबई : 21 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात. जगभरात निर्माण झालेली युद्धजन्य स्थिती, क्रूड ऑईलचे वाढलेले दर यामुळं शेअर मोठे बदल पाहायला मिळू शकतात. माझगाव डॉक शिपबिल्डर्स या कंपनीननं आंध्र प्रदेशच्या दुगराजपट्टनममध्ये एक ग्रीनफिल्ड शिपरयार्ड बनवण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग आणि हेवी इंडस्ट्रीज पार्कसोबत करार केला आहे. यामुळं 45 हजार लोकांना रोजगार मिळू शकतो. याचा स्टॉकवर परिणाम दिसू शकतो. याशिवाय लेन्सकार्ट सोल्यूशन्स लिमिटेडमध्ये 2047.4 कोटीची ब्लॉक डील होणार आहे. ज्यात Platinum Jasmine A 2018 Trust 682.45 रुपये प्रति शेअरच्या दर्शनी किंमतीवर शेअर विकत आहे.
FSSAI ने नेस्ले इंडिया च्या ‘NAN Excella Pro Stage 1’ आणि ‘Lactogen Pro 1’ उत्पादनांशी संबंधित नियमांचं पालन न केल्याबाब कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. नेस्लेच्या प्रवक्त्यांनी त्यांची उत्पादनं योग्य असल्याचं म्हटलंय. या घडामोडींचा परिणाम स्टॉकवर दिसू शकतो.



