Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

पावसाची उसंत अन् नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; देखावे पाहण्यासाठी रस्त्यांवर गर्दीचा महापूर!

पावसाने काही काळ उसंत घेतल्याने गणेशोत्सवाच्या उत्साहाला उधाण आले आहे. शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांनी साकारलेल्या आकर्षक आरास व देखाव्यांचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळाच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. यंदा शहरातील गणेशोत्सव मंडळांनी पौराणिक कथांसह सामाजिक आणि जनजागृतीपर विषयांना प्राधान्य दिले आहे. विविध मंडळांनी साकारलेले देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गोदावरी प्रदूषण, पर्यावरण संवर्धन यांसह विविध ज्वलंत सामाजिक विषयांवर आधारित देखावे साकारण्यात आले आहेत. घरगुती गणेश आरासदेखील पर्यावरणपूरक संकल्पनांना प्राधान्य दिले आहे.
गणेशोत्सवानिमित्त बी. डी. भालेकर मैदान परिसराला देखील जत्रेचे स्वरूप आले आहे. मैदानावरील पारंपरिक आणि जिवंत देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. येथील गणेशोत्सव मंडळाने साकारलेला ‘समुद्रमंथन’ हा देखावा भाविकांचे आकर्षण ठरत आहे.

नाशिक गणेशोत्सवातील प्रमुख देखावे व आकर्षणे

देखावा / विषयमुख्य वैशिष्ट्ये व ठिकाण समुद्रमंथन देखावाबी. डी. भालेकर मैदान परिसर ५१ फूट भव्य शिवलिंगभाविकांच्या आकर्षणाचा प्रमुख केंद्रबिंदू ६० फूट जगन्नाथ मंदिर प्रतिकृती पर्यावरणपूरक भव्य प्रतिकृती निर्माण सामाजिक व पर्यावरण संदेशगोदावरी नदी प्रदूषण मुक्ती व पर्यावरण संवर्धन संकल्पना नाशिक रोड विशेषनाशिकरोड येथे ज्योतिर्लिंग दर्शन देखावा

देखाव्यांसोबत सेल्फीचा मोह

सायंकाळ होताच शहरातील प्रमुख रस्त्यांवर गणेशभक्तांची वर्दळ वाढत आहे. विविध मंडळांचे देखावे पाहण्यासाठी कुटुंबांसह नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. बालगोपाळांसाठी देखावे आणि आकर्षक आरास करमणुकीचा विषय ठरत आहे.

अनेक भाविक देखाव्यांसोबत सेल्फी घेत असून गणेश आरास कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील रस्ते सायंकाळनंतर भाविकांनी फुलून जात आहेत. (छायाचित्र वर्णन: नाशिक : गणेशोत्सवात शनिवारी (दि. १९) देखावे पाहण्यासाठी झालेली भाविकांची गर्दी. फोटो: हेमंत घोरपडे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *