Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये विमानतळाजवळ स्फोट, अनेक फ्लाइटसना विलंब, हवाई हल्ल्याचा अलर्ट

पश्चिम आशियामध्ये हौथी बंडखोरांसोबतच्या संघर्ष सुरू असतानाच सौदी अरेबियाच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहे्त.सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने खळबळ उडाली आहे.

परिसरात आकाशात धुराचे मोठे लोट आणि आग दिसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र, या घटनेची अद्याप सौदी सरकारकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. पीटीआयच्या वृत्तानुसार, रियाधच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ किमान एका स्फोटाचा आवाज ऐकण्यात आला. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एएफपीशी बोलताना एका स्थानिक नागरिकाने आपबिती कथन केली. आम्ही विमानतळाच्या दिशेने काळा धूर आणि आग पाहिली, असा दावा त्याने केला. याच दरम्यान, फ्लाइटरडार 24च्या डेटानुसार, अनेक विमानांच्या येण्या जाण्याच्या वेळांमध्ये विलंब झाल्याचं दिसून आलं आहे. वेबसाइटवर 3.5 आणि 5 च्या दरम्यानचा ‘डिले इंडेक्स’ म्हणजे मोठ्या प्रमाणात विलंब तसेच अनेक विमानांची उड्डाणं रद्द झाल्याच्या गंभीर अडचणी आढळून आल्या.

अलर्ट जारी

हुथी बंडखोरांशी तणाव वाढला असून त्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या राजधानीत अशा प्रकारचा इशारा जारी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शुक्रवारी एका संभाव्य हवाई हल्ल्याबाबत सौदी अरेबियाने इशारा दिला होता, ज्यामुळे देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. हा इशारा रात्रभर कायम होता, त्याचदरम्यान विमानतळाजवळ काळ्या धुराचे लोट उठताना दिसले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *