Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. या कारणामुळे त्यांचा शनिवार आणि रविवार असा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. या कारणामुळे त्यांचा शनिवार आणि रविवार असा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.

अमित शहा हे कर्नाटकच्या हुबळी येथून थेट दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

शाह यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात विमानतळापासून ते शासकीय विश्रामगृहापर्यंत विशेष पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. शहरात सर्वत्र शाह यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते.

दरम्यान, अमित शहा यांच्या हस्ते हुपरी येथील कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ‘महालक्ष्मी ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाचे भूमिपूजन होणार होते. ‘वेस्ट टू बेस्ट’ आणि शून्य कचरा संकल्पनेवर आधारित असलेल्या या प्रकल्पासाठी तब्बल ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

स्थानिक आमदार राहुल आवाडे यांच्याकडून हुपरीतील या कार्यक्रमासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. आता अमित शहा यांच्या अनुपस्थितीत हा भव्य कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *