Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

CM फडणवीस अचानक नागपूरवरून थेट दिल्लीत; हायकमांडसोबत खलबतं; नेमकं कारण काय?

केंद्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. त्यामुळे राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. विशेषतः या सर्व घडामोडीमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये होते.

मात्र, शनिवारी अचानक नागपूरवरून थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीस दिल्ली दरबारी दाखल झाल्याने ते भाजपच्या हायकमांडसोबत विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहेत. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. त्यातच अचानक ठरलेल्या या दिल्ली दौऱ्याचे नेमके कारण समोर आले आहे.

सीएम फडणवीस शनिवारी नागपूरवरून थेट दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात हलचालींना वेग आला आहे. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असतानाच त्यांच्या या दौऱ्यात फडणवीस हे या दौऱ्यादरम्यान अनेक वरिष्ठ केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आहेत. फडणवीस हे या भेटीदरम्यान राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी महत्त्वाचे निर्णय आणि काही प्रमुख शासकीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच येत्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने त्याबाबतही या दौऱ्यादरम्यान हायकमांडसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

राज्यातील विविध महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यातच राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या १४ दिवसापासून मनोज जरांगे उपोषण करीत आहेत. त्यामुळे याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील या महत्वपूर्ण घडामोडीनंतर काय निर्णय होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *