Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरू; वैद्यकीय तपासणीस नकार, डॉक्टरांचे पथक परतले

अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मंगळवारी (ता. १) चौथ्या दिवशीही सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी सकाळी वैद्यकीय पथक अंतरवाली सराटी येथे दाखल झाले.

मात्र, जरांगे यांनी सध्या वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिला.उपोषणामुळे जरांगे यांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय पथकाकडून नियमित तपासणी केली जात आहे. मंगळवारी सकाळी डॉक्टरांचे पथक त्यांची तपासणी करण्यासाठी आले होते. मात्र, जरांगे यांनी तपासणी करण्यास नकार दिल्याने पथकाला तपासणी न करताच परतावे लागले. दरम्यान, “काही वेळाने पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा प्रयत्न करू,” अशी प्रतिक्रिया वैद्यकीय पथकातील डॉक्टरांनी दिली.

उपोषणाचा चौथा दिवस असल्याने जरांगे यांच्या प्रकृतीकडे समर्थकांचे तसेच प्रशासनाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकाकडून पुन्हा प्रयत्न केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *