Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ आणि घरगुती गॅसच्या दरात एक रुपयाची वाढ. नवीन दर १ सप्टेंबर पासून लागू

मुंबई : मुंबई आणि महानगर परिसरात महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी, तर घरगुती पीएनजीच्या दरात १ रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ आज, १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

दरवाढीमुळे मुंबई आणि परिसरात आता सीएनजी प्रति किलो ८८ रुपये झाला आहे, यामुळे सामान्यांचा प्रवास येत्या दिवसात महागणार आहे.

मध्य पूर्वेतील युद्धाच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय निर्देशांकांशी निगडित इनपुट गॅसच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. या वाढीमुळे एमजीएलने सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजीला मोठी मागणी असून, सीएनजी विभागासाठी लागणाऱ्या इनपुट गॅसचा मोठा भाग आयात केलेल्या स्पॉट RLNG द्वारे पूर्ण केला जातो. यामुळे सीएनजीसाठी लागणाऱ्या इनपुट गॅसच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. वाढलेली सीएनजीची मागणी पूर्ण करण्यासाठी एमजीएलला आता जास्त दराने स्पॉट RLNG मधून गॅस मिळवावा लागत आहे.

इनपुट गॅसच्या किमतीतील वाढीमुळे कंपनीद्वारे पुरवठा होणाऱ्या गॅसच्या एकूण खर्चावर लक्षणीय परिणाम झाला आहे. इनपुट गॅसच्या वाढत्या खर्चाची अंशतः भरपाई करण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांना सीएनजीचा निरंतर व शाश्वत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एमजीएलने सीएनजीची किमती २ रुपये प्रति किलोने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवाढीचा परिणाम मुंबई महानगर प्रदेश म्हणजे एमएमआरमध्ये सीएनजीवर चालणाऱ्या सुमारे १२ लाख वाहनांवर होण्याची शक्यता आहे. याशिवाय घरगुती पाईप गॅसच्या (पीएनजी) दरात प्रति किलो १ रुपये वाढ केली आहे. नवीन दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *