तुकाराम मुंढे इफेक्ट, Zomato ने बॅन केला तुमचा फेवरेट पदार्थ… देशभरात कुठेच देणार नाही डिलिव्हरी!

मुंबई : महाराष्ट्र एफडीएचे प्रमुख तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवाईचे परिणाम आता सगळीकडेच दिसायला लागले आहेत. वेगवेगळ्या रेस्टॉरंट आणि तसंच फास्ट फुड सेंटर्समधले बरेच फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत, या जेवणातून आर्टिफिशियल रंग गायब झाल्याचं दिसत आहे. तसंच अनेक चायनिज फुडचा रंगही आता लाल भडक न राहिलेला नाही. तुकाराम मुंढेंच्या एफडीएने केलेल्या या कारवाईची चर्चा देशभरात सुरू आहे, त्यातच आता फुड डिलिव्हरी ऍप असलेल्या झोमॅटोने तुमचा फेवरेट पदार्थच बॅन केला आहे.
तुम्ही जो पनीर टिक्का ऑर्डर केला होता, त्यातलं पनीर खरंच दुधापासून बनवलेलं होतं का? याबाबत तुमच्या मनात तुकाराम मुंढेंनी केलेल्या कारवाईनंतर शंका येत असेल. त्यातच आता झोमॅटोनेही त्यांच्या ऍपवरून ऑर्डर होणाऱ्या पनीरच्या डिशबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोने रेस्टॉरंटना एनलॉग पनीर वापरणं बंद करायला सांगितलं आहे.
झोमॅटोने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून भेसळयुक्त डेयरी उत्पादनांबाबत कठोर निर्णय घेतला आहे. झोमॅटोचे पार्टनर असलेल्या रेस्टॉरंटनी नैसर्गिक डेयरी उत्पादनांचा वापर सुरू करावा, अन्यथा मेन्यूमधून एनलॉग पनीरसारखे पदार्थ काढून टाकावेत, असं झोमॅटोने स्पष्ट केलं आहे.
डेयरी पनीर आणि एनलॉग पनीरमधला फरक
पारंपरिक डेयरी पनीर दुधापासून तयार करतात. दूध गरम करून त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगार टाकतात, ज्यामुळे दूध फाटतं आणि त्यापासून पनीर तयार केलं जातं. या पनीरमध्ये हाय प्रोटीन असतात. ज्या व्यक्ती नॉन व्हेज खात नाहीत, त्यांच्यासाठी डेयरी पनीर हा प्रोटीन प्राप्त करायचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो.
एनलॉग पनीर म्हणजे काय?
एनलॉग पनीर दिसायला डेयरी पनीरसारखंच असतं, पण यामध्ये दूधाचं प्रमाण अत्यंत कमी असतं किंवा नसतंच. एनलॉग पनीर तयार करण्यासाठी वनस्पीत तेल, फॅट, स्टार्च, प्लांट प्रोटीन, इम्यसल्पायर, स्टॅबिलायजर वापरले जातात, जे शरिरासाठी हानीकारक असतात.
ग्राहक जेव्हा रेस्टॉरंटमधून पनीर असलेला पदार्थ ऑर्डर करतो, तेव्हा त्याला या पदार्थामध्ये पारंपरिक पद्धतीने बनवलेलं पनीर मिळणं अपेक्षित असतं, त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी झोमॅटोने एनलॉग पनीर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.



