Navgan News



Add Space

क्राईमताज्या बातम्या

आईचे जावयासोबत प्रेमसंबंध, दोघांनी मिळून मुलीसोबत.. भयंकर घडलं

Crime News : बिहारच्या अरारियात अनैतिक संबंधातून एका महिलेच्या हत्येनं एकच खळबळ उडाली. नवविवाहित तरुणीच्या आईचे तिच्याच जावयासोबत, म्हणजेच मुलीच्या पतीसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते.

या घटनेची माहिती मुलीला समजताच, तिने विरोध केला. त्यानंतर आई आणि नवऱ्याने मिळून तिच्या हत्येचा कट रचला. मृत मुलीच्या वडिलांनी मुलीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि जावयाविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

 

नेमकं काय घडलं?

हा धक्कादायक प्रकार अरारिया आर. एस. पोलीस ठाणे परिसरातील प्रेमनगरच्या वॉर्ड क्र. 16 मध्ये घडली होती. मृत महिलेची ओळख मोहम्मद मुदशीर यांची मुलगी साजिगा परवीन अशी पटली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत मंगळवारी शवविच्छेदनासाठी पाठवला. घडलेल्या घटनेनुसार, दोन महिन्यांपूर्वी संबंधित महिलेचा विवाह हा अबू नासेर नावाच्या तरुणाशी झाला होता.

 

या प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली आई आणि पतीने साजिदाला अरारिया येथील गोधी चौकात नेऊन तिची निर्घृणपणे हत्या केली. नंतर मृतदेह प्रेम नगरमधील तिच्या माहेरच्या घरात संशयास्पद परिस्थितीत आढळून आला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळ सील करण्यात आले.

 

कौटुंबिक वादातून वाद, पीडितेच्या मानेवर हातावर जखमा

प्राथमिक तपासातून समोर आले की, कौटुंबिक वादातून गेल्या दोन दिवसांपासून मृत महिलेला तिच्या आई आणि पतीने त्रास दिला होता आणि मारहाण देखील केली होती. तिच्या मानेवर, हातांवर आणि पायांवर जखमा होत्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. संबंधित प्रकरणात मृत महिलेच्या आईला आणि पतीला अटक करण्यात आली. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

 

मृत मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांची पत्नी शाइस्ता हिचे नसरसोबत अनैतिक संबंध होते. हे प्रकरण लपवण्यासाठी शाइस्ताने आपल्या मुलीचे लग्न तिचा प्रियकर नसरसोबत जबरदस्ती लावून देण्यात आले. लग्नानंतर साजिदाला तिच्या आई आणि पतीच्या प्रेमसंबंधांविषयी कळले आणि तिने विरोध केला. या संघर्षामुळे आई आणि पतीने साजिदाच्या हत्येचा कट रचला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *