Navgan News



Add Space

क्राईमताज्या बातम्या

पोटच्या लेकरांसमोर नवऱ्यानं बायकोचा गळा चिरून संपवलं, पुढं भयंकर घडलं…

Crime News : पोटच्या लेकरांसमोर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला होता. एका क्षुल्लक वादाचे भीषण घटनेत कधी रुपांतर झाले याचा कोणालाही अंदाज बांधता आला नाही. या धक्कादायक प्रकरणात पीडित महिलेचा तिच्या पतीने गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

 

या घटनेनंतर चार मुलांना त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली होती, तर आरोपी पतीने घटनास्थळावरून पळ काढला. हे प्रकरण केरळच्या तिरूवनंतपुरममध्ये घडले. मृत पत्नीचं नाव हसीना (वय 36) अशी ओळख समोर आली. तसेच हत्या करण्यात आलेल्या आरोपीची ओळख सुरेश अशी आहे.

 

सुरेशने पत्नी हसीनावर धारदार शस्त्राने केला हल्ला

पती सुरेशने पत्नी हसीनावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि नंतर तिचा गळा चिरला. घटनेवेळी त्या जोडप्याची चार मुले घरात उपस्थित होती. घटनेनंतर जेव्हा त्यांनी आपल्या आईला रक्ताच्या थारोळ्यात छिन्नविछिन्न पडलेलं पाहिलं, तेव्हा घरातील ते दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला.

 

अशातच स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती देताच, पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेनंतर आरोपी पती आपल्या गाडीतून घरातून पळून गेला. सध्या त्याचा शोध सुरू असून तपास यंत्रणा आरोपीला शोधण्यासाठी छापे टाकत असून मोबाईल फोन आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याचे लोकेशन शोधण्याचे काम करत आहे.

 

पती-पत्नीमध्ये दिर्घकाळापासून कौटुंबिक वाद

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. प्राथमिक तपासात पती-पत्नीमध्ये दिर्घकाळापासून कौटुंबिक वाद असल्याचे समोर आले. मात्र, या हत्येमागील नेमका हेतू जाणून घेण्यासाठी पोलीस कुटुंबीय आणि शेजाऱ्यांची कसून चौकशी करत आहेत. सध्या या घटनेनं परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *